'हर घर तिरंगा' ने शहीद कुटुंबीयांशी जोडले नाते. सन्मान कार्यक्रम आयजितभारतीय जनता पक्षातर्फे 'युद्ध वीर परिवार' व ' वीर स्मारक स्वच्छता अभियान 'कार्यक्रम राबविण्यात आला.

'हर घर तिरंगा' ने शहीद कुटुंबीयांशी जोडले नाते. 
सन्मान कार्यक्रम आयजित.

भारतीय जनता पक्षातर्फे 'युद्ध वीर परिवार' व ' वीर स्मारक स्वच्छता अभियान 'कार्यक्रम राबविण्यात आला.

फक्त बातमी 
चेतन लूतडे वरोरा 


'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत बूधवारी भद्रावती, पिंपळगाव आणि वरोरा येथील शहीद जवानांच्या कुटुंबियांना भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 'शहीद, युद्ध-वीर परिवार संपर्क व वीर स्मारक स्वच्छता अभियान' या कार्यक्रमांतर्गत भद्रावतीचे शहीद विनोद रामदास बावणे, पिंपळगावचे शहीद अक्षय निकुरे आणि वरोराचे शहीद योगेश डाहुले यांच्या परिवारांना गौरविण्यात आले. मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीर सैनिकांना ही भावपूर्ण श्रद्धांजली होती.

या प्रसंगी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराजजी भैया अहीर, वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे, भाजपा नेते रमेशजी राजुरकर, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी शहीदांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांच्या समर्थनाचा आश्वासन दिला आणि वीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
या सन्मान कार्यक्रमाद्वारे शहीद जवानांना ऋणी असलेल्या राष्ट्राने त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक मान्यता देण्याचा महत्त्वाचा संदेश दिला गेला. 'हर घर तिरंगा' अभियानाच्या भावनेला साजेसा हा कार्यक्रम स्थानिक नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना पुनर्जागृत करणारा ठरला.

- *संवाददाता*
चेतन लूतडे वरोरा 

Comments