पेट्रोलपंपातील डिझेल मिश्रित पाण्यामुळे शेतजमीन नापीक! दत्तू झाडे कुटुंबावर उपासमारीची चिंता

पेट्रोलपंपातील डिझेल मिश्रित पाण्यामुळे शेतजमीन नापीक! दत्तू झाडे कुटुंबावर उपासमारीची चिंता  

वरोरा 

 वरोरा शहरालगत नागपूर महामार्गावर पेट्रोल पंप मधील डिझेल मिश्रित पाण्यामुळे शेतीची सुपीकता नष्ट झाल्याने नागपूर महामार्गावरील झाडे धाबा येथील दत्तू जंगलू झाडे (५५) या शेतकऱ्याच्या कुटुंबावर उपासमारीची संकट कोसळले आहे. गेल्या १५ वर्षांपासून अर्ध्या एकर शेतजमिनीवर भाजीपाला घेऊन उपजीविका करणारे दत्तू आता जमिनीच्या दर्जा खराब झाल्याने निरुपाय झाले आहेत.  

शेतात वाहत येणारे पाणी डिझेलमिश्रित असल्याने मातीची सुपीकता नष्ट झाली.  गेल्या १० वर्षांचे श्रम फसले असून शेती उत्पन्न कमी झाले.: "आधी भाजीपाल्यातून चांगली उत्पन्ने मिळत होती. आता जमीन वाळूसारखी झालीय. पाच जनावरे, पत्नी आणि दोन मुलांसह जगणं अशक्य झालं आहे," असे दत्तू यांचे म्हणणे आहे.
पेट्रोल पंप मालकाकडे व अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केली, पण कोणताही प्रतिसाद नाही. शेवटी पत्रकारांकडे मदत मागावी लागली.  

दत्तू, त्यांची पत्नी, दोन मुलं आणि पाच जनावरे शेतीवर अवलंबून आहेत. उत्पन्नाचा मुख्य स्रोत बंद पडल्याने अन्नधान्याचा टंचाईचा सामना करावा लागत आहेत. "जगण्याचा पर्याय उरला नाही," अशी हताशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.  

प्रदूषण विभागाचे अधिकारी येऊन जमिनीची व डिझेल टंकी लिक आहे का  याची पाहणी करावी. 
 
शेतकऱी झाडे यांचे आर्थिक नुकसान पंप मालकाने भरून द्यावे.  
डिझेल मिश्रित पाणी शेतावर येऊ नये यासाठी उपाययोजना करावी. 

स्थानिक प्रशासनाने या प्रकरणात लगेच हस्तक्षेप करून दत्तू कुटुंबाला न्याय द्यावा अशी विनंती प्रशासनाला केली आहे.

पेट्रोल पंप धारक मालकांना विचारण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्यावर कोणतेही प्रत्युत्तर देण्यास नकार दिला.
*************************

Comments