मेगा बचतगट 3 कोटी 79 लाख 60 हजार कर्ज वितरण सोहळा संपन्नचंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय
चंद्रपूर :भद्रावती तालुक्यातील चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 'चंदनखेडा, चोरा, पे. ऑ. मुधोली शाखांच्या अंतर्गत' मेगा बचत गट कर्ज वितरण सोहळा आज शनिवार, दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी कर्मवीर सभागृह चंदनखेडा येथे पार पडला.
शेतकऱ्यांची बैंक म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकरी, महिला बचत गटांसाठी अनेक योजना राबविल्या जात असतांनाच आता पुन्हा महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकीत बँकेकडून मेगा बचत गट कर्ज वितरण अभियान राबविले गेले.
या सोहळ्यात बचत गटांना कर्जवाटप करण्यात आले.
हा उपक्रम महिलांच्या स्वावलंबनाचा आणि ग्रामीण विकासाचा नवा टप्पा ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान जिल्हा बँकेचे अध्यक्ष रविंद्र श्रीनिवास शिंदे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या हस्ते झाले. विशेष प्रमुख पाहुणे श्रीमती प्रतिभा सुरेश उर्फ बाळू धानोरकर,विशेष प्रमुख पाहुणे आमदार करण देवतळे, विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, प्रसिध्द उद्योजक रमेश राजूरकर, चं.जि.म.स. बँकेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे, संचालक तथा विभागीय कर्ज समिती वरोरा विभागाचे अध्यक्ष जयंत टेमुर्डे, संचालक अवेश खान पठाण, गणेश तर्वेकर, प्रा. ललित मोटघरे, रोहित बोम्मावार, नंदा अल्लूरवार, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर आदी उपस्थित होते.
तालुक्यातील चोरा, चंदनखेडा, मुधोली येथील ३१ महीला बचतगटांना एकुण रु. १.५ कोटीचे कर्ज वितरण करण्यात आले. चोरा, चंदनखेडा, मुधोली येथील महीला बचतगट शुभलक्ष्मी महीला बचत गट पारोधी, सावित्री महीला बचत गट पारोधी, उत्कर्ष महीला बचत गट पारोधी, धनलक्ष्मी महीला बचत गट पारोधी, प्रार्थना महीला बचत गट पारोधी, निर्मला महीला बचत गट पारोधी, क्रांती महीला बचत गट पारोधी, प्रगती महीला बचत गट पारोधी, मुक्ताई महीला बचत गट कोकेवाडा (तु), नारी शक्ती महीला बचत गट कोकेवाडा (तु), रकुमाई महीला बचत गट कोकेवाडा (तु), आधार धान उत्पादक बचत गट कोकेवाडा (तु), ओम साई महीला बचत गट कोकेवाडा, ज्ञानेश्वरी महीला बचत गट कोकेवाडा (तु), शुभमुंगल महीला बचत गट चंदनखेडा, शेतकरी महीला बचत गट चंदनखेडा, परी महीला बचत गट चंदनखेडा, आदर्श महीला बचत गट चंदनखेडा, ममता महीला बचत गट बोरगांव, दुर्गा महीना बचत गट चरुर, जय मानिका महीला बचत गट वायगांव, धनलक्ष्मी महीला बचत गट कोकेवाडा (तु), सोनिया महीला बचत गट चोरा, मातोश्री महीला बचत गट चोरा, कल्यानी महीला बचत गट चोरा, प्रगती महीला बचत गट आष्टी, सहेली महीला बचत गट आष्टी, विद्या महीला बचत गट मासळ, कावेरी महीला बचत गट मुधोली, महालक्ष्मी महीला बचत गट मुधोली सोनामाता महीला बचत गट मुधोली अशा एकुण ३१ महीला बचत गटांना एकुण वाटप रु. १.५ कोटीचे वितरण करण्यात आले.
सोबतच अश्लेशा जीवतोडे, गजानन उताणे, अनिल चौधरी, अतुल जीवतोडे, प्रवीण बांदूरकर, ज्ञानेश्वर डुकरे, राजेंद्र डोंगे, परमेश्वर ताजणे, शरद जांबूळकर, विनोद घुगुल, राजु आसुटकर, कान्होबा तिखट, शामदेव कापटे, मनोहर आगलावे, मोहन भुक्या, शांता रासेकर, भानुदासजी गायकवाड, नयन जांबूळे, बंडूपाटील नन्नावरे, मारोती गायकवाड, शंकर गायकवाड भारत जीवतोडे, राजुजी काळमेगे, कृष्णा नन्नावरे, पंडितजी कुरेकार, गुड्डू चौधरी, दयाराम जांबूळे आदी उपस्थित होते.
*******
Comments
Post a Comment