चंद्रपूर (प्रतिनिधी) : क्राईस्ट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, ज्योती नगर तुकूम, चंद्रपूर येथे आज डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी हॉस्पिटलचे व्यवस्थापक फादर बिबिन यांच्या हस्ते केक कापून डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात हॉस्पिटलचे डॉक्टर या कार्यक्रमाला डॉ. इला चटर्जी, डॉ. राहुल लोधे, डॉ. राकेश अंबाटी, डॉ. ललित तामगाडगे, डॉ. जॉन पॉल, डॉ. मुग्धा पुल्लावार, डॉ. अजय कांबळे, डॉ. रवी मोहुर्ले, डॉ. जितीन डेव्हिड, डॉ. सीमा भंडारी, डॉ. प्रशांत, डॉ. वैष्णवी, डॉ. धीरज, डॉ. प्रणिता, डॉ. निशा, डॉ. रिफिया आणि डॉ. मेजो जोसेफ यांच्यासह सर्वच डॉक्टर उपस्थित होते, नर्सेस, तांत्रिक आणि प्रशासनिक स्टाफ उपस्थित होते.
फादर बिबिन यांनी डॉक्टरांना शुभेच्छा देताना सांगितले, "रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. डॉक्टर आपल्या निष्ठा, करुणा आणि ज्ञानाच्या जोरावर समाजातील आजारी व गरजू रुग्णांना नवा जीवनसंग देतात. डॉक्टरांचा पेशा हा केवळ व्यवसाय नसून तो एक पवित्र धर्म आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ही सेवा पोहोचविणे हेच आपले ध्येय असले पाहिजे."
क्राईस्ट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे २४ तास सेवा देणारे चॅरिटेबल हॉस्पिटल असून आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. येथे सर्वसामान्य व गरजू रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात दर्जेदार वैद्यकीय सेवा दिल्या जातात.
कार्यक्रमात डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली. उपस्थित डॉक्टर व स्टाफ यांनी समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याचा संकल्प केला. उपस्थित नागरिकांनीही या समाजसेवी उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन हॉस्पिटल व्यवस्थापनाने केले आणि शेवटी प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment