*चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राजकीय भूकंप!* *शिवसेना (उद्धव)चे नेते रविंद्र शिंदे व समर्थक भाजपमध्ये दाखल*

*चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राजकीय भूकंप!* 
*शिवसेना (उद्धव)चे नेते रविंद्र शिंदे व समर्थक भाजपमध्ये दाखल* 

चंद्रपूर
चेतन लूतडे 

चंद्रपुर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी चाललेल्या राजकीय रस्साकशीत मोठा वळण आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि बँकेचे संचालक रविंद्र शिंदे व वासुदेव ठाकरे  यांनी आज काही समर्थक संचालकां सह  मुंबई येथे रवींद्र दादा चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष आणि श्री चंद्रकांत दादा पाटील  यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार बंटी भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार करण देवतळे यांच्या हस्ते हे राजकीय स्वागत करण्यात आले. या घटनामुळे बँकेतील सत्तासंतुलन पूर्णपणे बदलले आहे.  

*११ वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत भाजपची मोठी कमाई**  
चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका अगदी अलीकडेच, ११ वर्षांच्या खंडानंतर झाल्या होत्या. या बँकेवर दशकांपासून काँग्रेसचे वर्चस्व होते, पण यावेळी भाजपने पूर्ण जोर लावून सत्ता परिवर्तनासाठी साठी चढाई केली. त्याचा परिणाम असा की, गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपला जास्त संचालक मंडळाची जागा मिळाली. काँग्रेसने आपले किल्ले राखण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले, पण रविंद्र शिंदे यांच्या भाजपमध्ये होणाऱ्या प्रवेशामुळे काँग्रेसच्या योजनांना मोठा धक्का बसला आहे.  

*सत्तासंघर्षात नवी वाटचाल*  
रविंद्र शिंदे यांनी भाजपमध्ये सामील होण्याच्या निर्णयामुळे बँकेच्या अध्यक्षपदाच्या रस्सीखेच्यात  भाजपची ताकद वाढली आहे. राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, ही घटना जिल्ह्यातील सहकारी बँकिंग राजकारणात मोठी भूमिका बजावणार आहे. आता पुढील आठवड्यात होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणता पक्ष वरचढ होतो, यावर सर्वांचे लक्ष केंद्रित आहे. 

सध्या चंद्रपुर जिल्ह्यातील राजकीय आणि सहकारी बँकिंग क्षेत्रात हालचाली वेगाने बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस यांच्यातील सत्तासंघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

रवींद्र शिंदे यांच्या प्रवेशा ने भाजपाची चंद्रपूर जिल्ह्यात ताकद वाढली असून रमेश राजूरकर  महाराष्ट्र राज्य विधानसभा परिषद सदस्य ,अक्षय सोनटक्के जिल्हा उपाध्यक्ष कामगार मोर्चा चंद्रपूर,  संतोष पवार शहराध्यक्ष वरोरा व भाजपा कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या भाजप प्रवेशाचे स्वागत केले आहे.

Comments