चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचा उपक्रम*ज्येष्ठ पत्रकार श्याम ठेंगडी व मंगल जीवने यांना "कर्मवीर पुरस्कार"*
*ज्येष्ठ पत्रकार श्याम ठेंगडी व मंगल जीवने यांना "कर्मवीर पुरस्कार"*
चंद्रपूर, २९ जुलै २०२५ :
चेतन लूतडे
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ (CWS) च्या वतीने **१ ऑगस्ट २०२५, शुक्रवारी सकाळी ११ वाजता, वरोरा नाका येथील पत्रकार संघ कार्यालयात "पत्रकार दिन व कर्मवीर पुरस्कार वितरण सोहळा"** आयोजित करण्यात आला आहे. यावेळी वरोरा तालुक्यातील *तरुण भारत दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार श्याम ठेंगडी* आणि बल्लारपूर येथील *ज्येष्ठ पत्रकार मंगल जीवने* यांना संघाचा "कर्मवीर पुरस्कार" प्रदान करण्यात येणार आहे.
अतिथी परिवार :
- **अध्यक्ष** : पुलकित सिंह (जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी)
- **उद्घाटक व मार्गदर्शक** : डॉ. प्रा. गणेश खवसे (दैनिक नवराष्ट्र वृत्त संपादक)
- **प्रमुख अतिथी** : रवींद्र शिंदे (सिडीसीसी बँक चंद्रपूर अध्यक्ष)
**श्याम ठेंगडी** यांनी लोकमान्य विद्यालयात शिक्षक म्हणून सेवा देऊन समांतरपणे **तरुण भारत दैनिकाचे तालुका वार्ताहर** म्हणून बहुवर्षे काम केले. त्यांच्या तलख लेखणीमुळे सामान्य नागरिकांच्या समस्यांना माध्यम मिळाले. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी वरोरा तालुक्यात त्यांची ओळख एका "सच्च्या निर्भीड पत्रकार" म्हणून आहे. जिल्ह्यातील सर्व पत्रकारांतर्फे अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला आहे.
व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे विदर्भ संघटक म्हणून उत्तम कार्य पत्रकारांसाठी करीत आहे. या संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
संघाचे अध्यक्ष मिलिंद कुंभार यांनी सर्व पत्रकार बंधू, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांना मोठ्या संख्येने सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment