*महाकाल कावड यात्रा उत्साहात भटाळ्याला रवाना**वरोड्यात नव्हे तर जिल्ह्यात प्रथमच महाकाल कावड यात्रेचे आयोजन**जागृती फाउंडेशनचा उपक्रम*

*महाकाल कावड यात्रा उत्साहात भटाळ्याला रवाना*

*वरोड्यात नव्हे तर जिल्ह्यात प्रथमच महाकाल कावड यात्रेचे आयोजन*

*जागृती फाउंडेशनचा  उपक्रम*

वरोडा : शाम ठेंगडी
        वरोडा येथील जागृती फाऊंडेशनच्या वतीने श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजे आज 28 जुलैला महाकाल कावड यात्रा येथील आंबेडकर चौकातून मोठ्या उत्साहात व जल्लोषात भटाळ्याला रवाना झाली. या कावड यात्रेत पुरुष, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
       या कावड यात्रेत काही छोटी मुले ही सहभागी झाली होती. कावड यात्रेत सहभागी रुहीणा धनवलकर ही सात वर्षीय बालिका सर्वांचे लक्ष वेधून घेत होते हे विशेष. ही कावड यात्रा येथील आंबेडकर चौकातून निघून तालुक्यातील भटाळा येथील प्राचीन शिवमंदिरात दुपारी तीन च्या सुमारास पोहोचली.तेथे गंगा व नर्मदा नदीच्या पवित्र जलाने महादेवाच्या लिंगाला जलाभिषेक करण्यात आला. यावेळी हरीश जाधव यांचेसह भटाळ्याचे नागरिक ही उपस्थित होते. वरोड्यातून प्रथमच अशा प्रकारच्या महाकाल कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
         येथील आंबेडकर चौकातून सकाळी दहा वाजता निघालेली ही महाकाल कावड यात्रा आंबेडकर चौक- सपाटे चौक-शहीद योगेश दाहुले-रत्नमाला चौक- आनंदवन चौक असा होत चिमूर रोडने खैरगाव- परसोडा-खातोडा- सालोरी या मार्गाने भटाळा येथील महादेव मंदिरात पोहोचली. या शोभायात्रेच्या मार्गात यात्रेत सहभागी भक्तांसाठी हरीश केशवानी व मित्र मंडळातर्फे साबुदाणा  उसळ व लेमन टी, श्याम टोकसिया व अजय रेड्डी यांच्याकडून लिंबू पाणी, मनीष जयस्वाल यांच्याकडून फळ वाटप करण्यात आले. संपूर्ण यात्रेत क्लबच्या वतीने पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या शोभायात्रेसोबत गांधी योग मंडळाच्या रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती. कावड यात्रेत सहभागी सर्वांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या.या कावड यात्रेत ग्रामीण भागातील ही युवक सहभागी झाले होते. आंबेडकर चौकातून शोभायात्रा निघत असताना जागृती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रवीण धनवलकर, श्याम टोकसिया, हितेश बजाज,योगेश डोंगरवार,शिरीष उगे,रुपलाल कावळे यांचे उपस्थितीत कावड यात्रेतील सर्व कावडची पूजा करण्यात आली. यावेळी राधे राधे महाराज यांनी पौरोहित्य केले. यानंतर शंखनाद झाल्यानंतर कावड यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी *' बम बम बोले', 'जय महाकाल'* अशा घोषणा दिल्या जात होत्या.
       यानंतर भटाळा येथील प्राचीन महादेव मंदिरातील शिवलिंगाला गंगा,यमुना, सरस्वती, नर्मदा, शिप्रा या पाच नद्यांच्या पवित्र जलाने जलाभिषेक करण्यात आला.
    या महाकाल कावड यात्रेसाठी ओम सुधाकर वरभे यांचे कडून ओंकारेश्वर येथील नर्मदा नदीचे व उज्जैन येथील शिप्रा नदीचे तर गंगा, यमुना, सरस्वती या त्रिवेणी संगमाचे पवित्र जल श्याम टोकसिया यांचेकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. गंगासागर येथील गंगा नदीचे पवित्र जल जागृती फाऊंडेशनने उपलब्ध करून दिली आहे.
        संपूर्ण महाकाल कावड यात्रेदरम्यान चौक पोलीस बंदोबस्त होता.

Comments