छोटूभाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघातर्फे आयोजित स्व. स्वप्नील महावादीवार स्मृती प्रित्यर्थ "विकसित विद्यार्थी- सक्षम राष्ट्र" या व्याख्यानमाला
चंद्रपूर दि. २७ जुलै २०२५ :
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना आहाराची काळजी घेणे अतिशय गरजेचे असून आहारामध्ये जास्तीत जास्त संख्येने प्रथीने समाविष्ट करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि शल्यचिकित्सक तसेच छोटूभाई पटेल हायस्कूलचे माजी विद्यार्थी डॉ. अनुप पालीवाल यांनी व्यक्त केले.
छोटूभाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघातर्फे आयोजित स्व. स्वप्नील महावादीवार स्मृती प्रित्यर्थ "विकसित विद्यार्थी- सक्षम राष्ट्र" या व्याख्यानमालेत ते बोलत होते.
यावेळी बोलतांना डॉ. पालिवाल यांनी बालकांच्या आरोग्या वरील विविध विषयावर प्रकाश टाकला.तसेच फास्ट फूड बालकांच्या आरोग्यावर कसे गंभीर दुष्परिणाम करतात यावर मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी मोबाईल चा नाद सोडायला हवा आणि मैदानी खेळाला विशेष प्राधान्य द्यायला हवेत तसेच जन्क फूड खाणे टाळायला हवे.
सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते स्व. छोटुभाई पटेल यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी छोटुभाई पटेल हायस्कुलच्या मुख्याध्यपिका सौ. कांत (वैद्य) मॅडम, उपमुख्याध्यापक मानकर सर, गर्गेलवार सर, कुंभरे मॅडम, माजी विद्यार्थी तथा गोंडपिपरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पराग जवळे यांची उपस्थिती होती.
तसेच छोटूभाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघातर्फे माजी विद्यार्थी जितेंद्र मशारकर, धीरज साळुंके, सागर कुंदोजवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार शाळेचे शिक्षक बम सर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचारी तसेच छोटूभाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
विकसित राष्ट्र घडविण्यासाठी विद्यार्थ्यांचे विकसित होणे गरजेचे : डॉ. पराग जवळे
उपचारांपेक्षा प्रतिबंध बरा या उक्तीप्रमाणे जर रोगप्रतिकार शक्ती वाढवली तर छोट्या छोट्या आजारापासून आपले व आपल्या परिवाराचे संरक्षण करता येते. त्याकरिता आदर्श जीवनशैली पाळावी. विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठावे आणि रात्री लवकर झोपावे, सकाळी नियमितपणे व्यायाम करावा..उघड्यावरील पदार्थ खाऊ नये, शिळे अन्न टाळावे , आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा, कॅल्शियम युक्त पदार्थ खावे. तसेच आरोग्यासोबत स्वच्छतेची सुद्धा विशेष काळजी घ्यावी. विकसित राष्ट्र घडविण्यासाठी विद्यार्थ्यांचे विकसित होणे गरजेचे आहे असे मत या व्याख्यानमाले दरम्यान या उपक्रमाचे विशेष पाहुणे गोंडपिपरी इथे कार्यरत तालुका आरोग्य अधिकारी आणि छोटूभाई पटेल हायस्कूलचे माजी विद्यार्थी डॉ. पराग जवळे यांनी व्यक्त केले.
पावसाळ्यात होणारे सामान्य आजार व त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा विषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी रीरिक आरोग्यासोबत मानसिक रोग्याकडे सुद्धा लक्ष द्यावे कारण आपण मानसिकरित्या तंदुरुस्त राहू तेव्हाच आपण शारीरिक रित्या मजबूत राहू असे मत त्यांनी व्यक्त केले.
******
Comments
Post a Comment