लोकमान्य कन्या महाविद्यालयात शालेय गणवेश वितरण कार्यक्रम संपन्न
फक्त बातमी
वरोरा ता 16/7/25
समाजातील दात्यांच्या सहकार्याने वरोरा येथील लोकमान्य कन्या महाविद्यालयात गणवेश वाटप करण्यात आला. . कन्या महाविद्यालयात प्रथमच पाचव्या वर्गात शिकणाऱ्या 130 विद्यार्थिनींना शालेय गणवेश वितरित करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी या महाविद्यालयात येत असतात. ता 15 ला शाळेच्या आवारात छोटे काही कार्यक्रम घेऊन गणवेश वितरण करण्यात आले.
वरोरा तालुक्यात एकमेव कन्या महाविद्यालय आहे. तिथे ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात मुली शिक्षण घेण्यासाठी येतात. बऱ्याच मुलीच्या घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते. त्यामुळे शालेय पोशाख घेण्यासाठी त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. कन्या महाविद्यालय पहिल्यांदा पाचव्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थिनींना समाजातील दात्यांकडून गणवेश विनामूल्य उपलब्ध करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कन्या महाविद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ हक्के, सेवानिवृत्त कलाशिक्षक अविनाश कांबळे, दैनिक सकाळचे तालुका बातमीदार बालकदास मोटघरेदीपक वाघे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना गणवेशाचे वितरण करण्यात आले.
यावेळी कन्या विद्यालयाच्या शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी पतरंगे मॅडम आणि आभार प्रदर्शन कुमारी पाकमोडे मॅडम यांनी केले.
Comments
Post a Comment