रोटरी चे जनजागृती चे कार्यक्रम प्रभावशाली --- डॉ.श्रीनिवास पिलगूलवार रोटरी क्लब व लोकमान्य महाविद्यालयाचा लोकसंख्या दिन संयुक्त उपक्रम

रोटरी चे जनजागृती चे कार्यक्रम प्रभावशाली --- डॉ.श्रीनिवास पिलगूलवार
 रोटरी क्लब व लोकमान्य महाविद्यालयाचा लोकसंख्या दिन संयुक्त उपक्रम 

वरोरा दि १२ जुलै
    शाश्वत विकासासाठी पर्याप्त लोकसंख्या आवश्यक आहे. आज जगाची लोकसंख्या ८२० कोटी असून त्याकरता उपलब्ध असलेली संसाधने कमी पडत आहे. लोकसंख्या नियंत्रित नसेल तर राष्ट्राचा नाश होतो त्यामुळे राष्ट्राची लोकसंख्या कमी होणे आवश्यक आहे. जर मानवाने ही नियंत्रित केली नाही तर भूकंप,  नैसर्गिक आपत्ती, महापूर आणि सुनामी सारख्या आपदांनी ती कमी होईल. या जनजागृती करिता रोटीने घेतलेला पुढाकार स्तुत्य असल्याचे प्रतिपादन डॉ. श्रीनिवास पिलगुरवार यांनी केले. रोटरी क्लब आणि लोकमान्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने ते बोलत होते.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयातील समाजशास्त्रविभाग प्रमुख डॉ .श्रीनिवास पिलगुलवार,  तसेच योगेश डोंगरवार, अध्यक्ष, रोटरी क्लब,वरोरा हे होते.
 याप्रसंगी बोलताना योगेश डोंगरवार यांनी लोकसंख्या नियंत्रणात आणण्याकरता शासनाने उपाययोजना करावी आणि त्याकरिता सामाजिक संस्थांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले. वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम बघता रोटरीने लोकसंख्या नियंत्रणाचा कार्यक्रम हाती घेतल्याचेही त्यांनी सांगितले. 
       कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. शास्त्री यांनी लोकसंख्या वाढ नियंत्रणावर समाजात जाणीव जागरूकता कशी वाढेल यावर मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे संचालन डॉ.रविंद्र शेंडे यांनी केले तर डॉ.प्रशांत खुळे यांनी रोटरी क्लबची भूमिका आणि रोटरी क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमाबाबत माहिती सांगितली. आभार प्रा.श्रीकांत पुरी यांनी केले.
याप्रसंगी रोटरी क्लबचे नितेश जयस्वाल,  अभिजीत बोथले,  पवन वरघणे, अभिजीत मणियार, अदनान साधिकोट आणि महाविद्यालयातील विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक वृंद तसेच  शिक्षकेत्तर कर्मचारी,रोटरी क्लब आदींनी सहकार्य केले.

Comments