चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र शिंदे

 चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र शिंदे .

चंद्रपूर : 
चेतन लूतडे 

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत रवींद्र श्रीनिवासराव शिंदे यांना संचालक मंडळाने एकमताने व बिनविरोध निवडून दिले आहे.  
शिंदे यांनी या निवडीबद्दल संपूर्ण संचालक मंडळाचे मनःपूर्वक आभार मानून सांगितले, *"या अत्यंत महत्त्वाच्या व जबाबदारीच्या पदावर माझी निवड करून संचालक मंडळाने माझ्यावर दाखविलेला विश्वास माझ्यासाठी अत्यंत गौरवाचा आहे. सर्व संचालकांनी एकसंघपणे दिलेला पाठिंबा प्रेरणादायक ठरतो."*  

त्यांनी भविष्याच्या आशयासह सांगितले, *"या पदाच्या माध्यमातून मी सहकार क्षेत्राच्या अधिक सक्षम व पारदर्शक व्यवस्थापनासाठी कटिबद्ध राहीन. बँकेच्या प्रगतीसाठी सर्वांच्या सहकार्याने कार्यरत राहणार आहे."* शिंदे यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्या सर्व संचालकांचे पुन्हा एकदा आभार मानले.  

शिंदे यांनी नव्याने अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.

Comments