*युवकास पोलिसांनी घेतली ताब्यात!*
वरोडा :
शहरातील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर मध्ये मद्यधुंद युवकाने गोंधळ घातला. गोंधळ घालणाऱ्या या युवकाबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी वरोडा पोलीस स्टेशनला माहिती देताच पोलिसांनी सदर युवकास ताब्यात घेतले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हा युवक आज 21 जुलै रोज सोमवारला दुपारच्या सुमारास महाविद्यालयात शिरण्याचा प्रयत्न करत होता. यावेळेस तो मद्धुंद अवस्थेत असल्याने प्रवेशद्वारावर त्याला सुरक्षा रक्षकाने अडविले.
आपणास ओळखीच्या एका मुलीला भेटायचे असल्याचा कांगावा तो करू लागला. परंतु सुरक्षा रक्षकाने त्याच मज्जाव केल्याने त्याने प्रवेशद्वारावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सदर मुलगी आपल्या ओळखीची असून आपण तिच्याशी विवाह करणार असल्याचेही तो सांगत होता. गोंधळ घालणारा हा युवक शांत होण्याची चिन्हे न दिसल्याने शेवटी प्राचार्यांनी याची सूचना वरोडा पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी त्वरेने हालचाल करत घटनास्थळी येऊन युवकास ताब्यात घेतले.
सदर मुलगी ही परगावाहून महाविद्यालयाला येणे जाणे करत असल्याने सुरक्षितता म्हणून प्राचार्यांनी तिला पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
Comments
Post a Comment