शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना कृषी स्प्रे पंप वाटप.
*वरोरा* : राज्यातील शेतकरी समुदायाचे प्रिय नेते तथा माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त टेमूर्डा येथील ग्रामपंचायत भवनात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी शेतकरी, अपंग, विधवा महिला आणि शेतमजुरांसाठी सरकारला धडा शिकवणाऱ्या बच्चू भाऊ यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.
*आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबांना कृषी साहाय्य*
या कार्यक्रमात वरोरा तालुक्यातील १ जानेवारी २०२४ नंतर आत्महत्या केलेल्या २१ शेतकरी कुटुंबांपैकी १८ कुटुंबांना कृषी स्प्रे पंप वाटप करण्यात आले.
यावेळी शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत हमीभाव दिल्याशिवाय शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणार नाही, शेतकऱ्यांच्या मुलाने शिक्षित होऊन अंधश्रद्धेच्या कर्मकांडातून मुक्त होण्याची आशा व्यक्ती केली आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील कोणतीही गरज पडल्यास आम्ही मदत करू असे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुखांनी दिले.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजू चिकटे यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हात पुढे केला असून या सेवाभावी कार्यक्रमासाठी डुकरे यांचे अभिनंदन केले आहे.
रक्तदान शिबिर आणि पत्रकार सत्कार
कार्यक्रमाची सुरुवात रक्तदान शिबिराने झाली, ज्यामध्ये नागपूरच्या अमन ब्लड बँकद्वारे १० स्वयंसेवकांनी रक्तदान केले. तसेच वृत्तसंस्थेच्या पत्रकारांचा जनतेला न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नांबद्दल कार्यक्रमात आलेल्या सर्व पत्रकरांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, वरोरा यांचे संचालक तथा शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ मत्ते (अध्यक्ष), समिती सभापती राजू चिकटे , पत्रकार श्याम ठेंगडी आणि शहीद अक्षय निकुरे यांचे वडील दिगंबर निकुरे यांनी हजेरी लावली. संदीप झाडे यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांचा सहभाग*
आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, आनंदवन (वरोरा) आणि पिपंळगाव (मा) येथील विद्यार्थ्यांनी रक्तदान करून तसेच इतर मदतीने कार्यक्रमाला यशस्वी केले. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी नेते किशोर डुकरे (वरोरा) यांनी केले होते.
Comments
Post a Comment