वरोडा : शाम ठेंगडी
भगवा ध्वज राष्ट्रजीवनातील स्फूर्तिकेंद्र आहे. सध्या धर्म आणि संस्कृती यांवर विविध आघात होत असून त्यांचा यथाशक्ती प्रतिकार केला पाहिजे. कधीकधी विचारांच्या विसंगतीमुळे चमत्कारिक स्थिती निर्माण होते. आताच्या काळात स्त्री साक्षरतेपेक्षा तिचे एकूण सशक्तीकरण काळाची गरज आहे. व्यक्तीचे विचार हे कालसापेक्ष असतात.राष्ट्रासाठी त्याग व समर्पण करण्याची प्रेरणा देण्याचे सामर्थ्य भगव्या ध्वजात आहे. यातून उत्तम संघटन आणि युवा पिढी घडविण्याचे काम होते, असे विचार नागपूर येथील नरकेसरी प्रकाशनाच्या संचालीका आणि कुटुंब उद्बोधक मीराताई कडबे यांनी व्यक्त केले.
श्रीराम मंदिर देवस्थान येथे 13 जुलै रोज रविवारला झालेल्या राष्ट्र सेविका समितीच्या गुरुपौर्णिमा उत्सवात उद्बोधक म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रा. से. समितीच्या नगर कार्यवाहीका अपूर्वा बुजोणे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
. मीरा कडबे यांनी लव्ह जिहाद सारख्या दुर्दैवी मुद्द्यांचा कायमस्वरूपी नायनाट व्हावा आणि आपत्ती व संकटाच्या काळात आजच्या स्त्रीने खंबीर होण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.
ध्वजारोहण आणि समिती प्रार्थनेनंतर रसिका घुडे यांनी प्रास्ताविक केले. पल्लवी धनेगावकर यांनी वैयक्तिक तर शुभा रेलकर हिने सांघिक गीत सादर केले. आर्या घुडे हिने अमृत वचन तर अवंती घुडे यांनी सादर केले. मयुरी घुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता डॉ. जयश्री शास्त्री यांनी गायलेल्या वंदे मातरमने झाली.
Comments
Post a Comment