भद्रावतीच्या नकुल प्रशांत शिंदे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना( एकनाथ शिंदे )गटात प्रवेश

भद्रावतीच्या नकुल प्रशांत शिंदे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना( एकनाथ शिंदे )गटात प्रवेश 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश.


भद्रावती:- रवी बघेल 

उच्च शिक्षित तरुणांनी आज राजकारणात येऊन राजकारणाला एक नवी दिशा देण्याची गरज आहे. यालाच अनुसरून भद्रावती येथील उच्चशिक्षित युवक नकुल प्रशांत शिंदे यांनी भद्रावती तालुक्यातील शेकडो युवा कार्यकर्त्यांसह शिवसेना (एकनाथ शिंदे )गटात प्रवेश केला.

दिनांक 28 जून 2025 रोजी ग्रँड मिलेनियम एअरपोर्ट  नागपूर येथे आयोजित शिवसेना प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पक्षप्रवेश सोहळा पार पडला. 

याप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ ,राज्यमंत्री आशिष जयस्वाल ,आमदार कृपाल तुमाने ,आमदार मनीषा कायंदे , शिवसेना नेते किरण पांडव प्रामुख्याने उपस्थित होते. 

पक्ष वाढीच्या दृष्टीने या तरुणाईची ताकद निश्चितच बळ देणारी ठरेल असा विश्वास या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच नकुल प्रशांत शिंदे यांच्याकडून  पक्ष वाढीच्या दृष्टीने मोठ्या कार्यांच्या अपेक्षाही व्यक्त केल्या. 

काही दिवसांपूर्वीच भद्रावती येथील 11 माजी नगरसेवकांनी मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला होता हे विशेष. 

नागपूर येथील कार्यक्रमात शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे ,जिल्हाप्रमुख नितीन मत्ते,  माजी नगरपरिषद उपाध्यक्ष्य प्रफुल्ल चटकी,माजी नगरसेवक सुधीर सातपुते ,राजू सारंगधर, पप्पू सारवाण  तसेच वरोरा येथील माजी नगरसेवक व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments