वरोरा
चेतन लूतडे
जिल्हा सहकारी को-ऑपरेटिव्ह बँक च्या निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत यामध्ये शिवसेना पक्षाचा वापर करून फक्त अध्यक्ष पद मिळविण्यासाठी व ज्या काही चौकश्या लागलेले आहेत त्या थांबवण्यासाठी. शिंदे यांनी हा प्रवेश घेतलेला होता. अशी खळबळजनक टीका यावेळी करण्यात आली. त्यामुळे पहिले पासूनच चंद्रपूर जिल्हा प्रमुखाचे पद देण्यासाठी माझी नाराजी होती असे त्यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्याच्या नवीन जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी लवकरच सुरू होणार असल्याचे विदर्भ जनसंपर्क प्रमुख प्रशांत कदम यांनी सांगितले आहे. याबाबत विदर्भ प्रमुख वरिष्ठ नेतृत्वाला अहवाल सादर करणार आहेत.
*वरोरा येथे शिवसेनेच्या नेत्यावर पोस्टर लावल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया*
वरोरा शहरात शिवसेनेच्या नेते राऊत साहेब यांच्यावर टीकात्मक पोस्टर लावण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना प्रशांत कदम यांनी स्पष्ट केले की, *"विरोधकांना आता कोणतेही काम उरलेले नाही. आमच्या नेतृत्वाचा अपमान सहन केला जाणार नाही. याबाबत वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. पुढील १५ दिवसात जर पोस्टर लावणाऱ्या व्यक्तीला अटक झाली नाही, तर आनंदवन चौक येथे शिवसेना ‘स्टाईल’ आंदोलन करण्यात येईल."*
या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख पंकज नाशिककर यांनीही कदम यांच्या मताला पाठिंबा देत म्हटले आहे की, *"एखाद्याच्या जाण्याने शिवसेना संपत नाही. पुढील काळात पक्ष आपली सत्ता पुन्हा स्थापित करेल."*
*शिवसेनेची बैठक वरोरा येथे पार*
वरोरा येथील विश्रामगृहावर शिवसेनेची बैठक विदर्भ जनसंपर्क प्रमुख प्रशांत कदम आणि जिल्हाप्रमुख गिरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी शेकडो शिवसैनिक हजर होते. बैठकीत पक्षाच्या भावी रणनीतीवर चर्चा झाली.
या वरोरा येथील विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत संदीप गिरे जिल्हाप्रमुख चंद्रपूर, मनीष जेठानी चंद्रपूर जिल्हा संघटक, दत्ता बोरेकर, वैभव डहाणे विधानसभा समन्वयक, नंदलाल टेंभुर्डे तालुकाप्रमुख वरोरा, नंदू पडाल भद्रावती तालुकाप्रमुख, हेमराज कुरेकर वरोरा शहर प्रमुख, इतर पद अधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थितीत होते.
Comments
Post a Comment