घोरपड दिले जीवनदान – वन्यजीव प्रेमींचा स्तुत्य उपक्रम

घोरपड दिले जीवनदान – वन्यजीव प्रेमींचा स्तुत्य उपक्रम

रवी बघेल भद्रावती 

भद्रावती शहरातील म्हलारी बाबा सोसायटी परिसरातील एका मंदिराच्या खोलीत घोरपड आढळल्याची माहिती नागरिक श्री. आशिषजी ठेंगणे यांनी वन्यजीव रक्षक श्री. अनुप येरणे यांना दिली. माहिती मिळताच अनुप येरणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकेश डूडूरे आणि प्रथमेश पुल्लूरवार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन घोरपड सुरक्षितपणे पकडून यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन पार पाडले.

एकीकडे काही लोक अजूनही घोरपडीसारख्या दुर्मिळ वन्यप्राण्यांची शिकार करत असताना, दुसरीकडे वन्यजीव प्रेमी अशा प्राण्यांचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी पुढे येत आहेत, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.

या संपूर्ण उपक्रमात वन्यजीव प्रेमी आशिष चायकाटे, श्रीपाद बाकरे, शैलेश पारेकर यांचे मार्गदर्शन लाभले. रेस्क्यू झाल्यानंतर घोरपडला सुरक्षितपणे निसर्गात मुक्त करण्यात आले. यावेळी अनेक सहकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी समाजातील संवेदनशील नागरिकांनी पुढे येणे ही काळाची गरज असून, अशा घटनांमुळे सकारात्मक संदेश समाजात पोहोचत आहे.
------------------****----------***---------------

मोहर्ली येथील बफर झोन मध्ये कॉलर टायगरची दहशत



Comments