*लोकनेते बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त सामूहिक अभिवादन आणि सेवाभावी उपक्रम*

*लोकनेते बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त सामूहिक अभिवादन आणि सेवाभावी उपक्रम* 

वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा,*भद्रावती*,  — दिवंगत लोकनेते स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर चौक, भद्रावती येथे त्यांना सामूहिक अभिवादन करण्यात आले. बाळूभाऊंनी आपल्या कर्तृत्वाने आणि सहजस्वभावाने जनतेच्या मनात मोठे स्थान निर्माण केले होते. त्यांच्यावरील लोकांचा आदरभाव यावेळीही प्रकर्षाने जाणवला.  

या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बाळूभाऊंवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांना भोजन आणि छत्र्या वाटण्यात आल्या.  
*शिक्षणसेवेचा वसा पुढे नेत स्कूल व्हॅनचे दान**  
लोकनेते बाळूभाऊ धानोरकर यांच्या समाजसेवेच्या वारसाला साजेसे असे एक सेवाभावी उपक्रम राबवण्यात आला. भद्रावती येथील अं. ध. विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी शाळेला एक स्कूल व्हॅन भेट देण्यात आली.  
बाळूभाऊंनी ही व्हॅन शाळेसाठी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या वचनाचा सन्मान ठेवून ही व्हॅन शाळेला प्रदान करण्यात आली. यामागील उद्देश ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलांना शिक्षणापर्यंत सहज पोहोच मिळावी, त्यांच्या शिक्षणाचा प्रवास सोपा व्हावा आणि बाळूभाऊंच्या शिक्षणप्रेमी विचारसरणीला अधिक बळ मिळावे, हा होता.  

या कार्यक्रमाद्वारे बाळूभाऊंच्या समाजहिताच्या कार्याचा गौरव करण्यात आला, तसेच त्यांच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 वरोरा येथे रुग्णसेवा उपक्रमाचा शुभारंभ
 दिवंगत लोकनेते व खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त वरोरा येथील शासकीय रुग्णालयात एक विशेष समाजसेवा उपक्रम राबवण्यात आला. बाळूभाऊंच्या लोकहितवादी विचारसरणीला साजेसा हा उपक्रम रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत भोजन वाटप करण्याचा होता.  

*रुग्णांच्या सेवेसाठी मोफत भोजन योजना*
स्व. बाळूभाऊ धानोरकर हे आपल्या कार्यकाळात सतत गरीब, आजारी आणि असहाय्य लोकांच्या सेवेसाठी झटले. त्यांच्या या समाजसेवेच्या प्रेरणेतून, रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत भोजन पुरवठा करण्याची योजना सुरू करण्यात आली. यामुळे दूरदूरच्या गावांतून आलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना अन्नाची चिंता न करता रुग्णसेवा करता येईल.  

या कार्यक्रमात रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर खूजे, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. रुग्णांच्या कुटुंबीयांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आणि बाळूभाऊंच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धांजली वाहिली.  

या कार्यक्रमासाठी वरोरा शहरातील सरकार ग्रुपचे सर्व सदस्य तसेच त्यांचे पुत्र मानस व पार्थ धानोरकर , प्रवीण काकडे, राजू महाजन, विलास टिपले , दिपाली माटे, शुभम चिमूरकर, काशीफ खान, छोटू भाऊ शेख, राजू चिकटे, नानाभाऊ चांभारे, अनिल झोटिंग, चंद्रपूर जिल्हा कमिटीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments