शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी काँग्रेसचे राजू महाजन यांची मोर्चा बांधणी. वरोरा भद्रावती विधानसभेत राजकीय सुरुंग
वरोरा भद्रावती विधानसभेत राजकीय सुरुंग
वरोरा
चेतन लूतडे
शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदासाठी बरीच रस्सीखेच चालू असताना.काँग्रेसचे धुरंदर राजनीतिकार राजू महाजन यांचा शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदासाठी नाव घेताच राजकारणात प्रलय आलेला आहे.
बऱ्याच दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यातील राजनीतीला सुरुंग लागला आहे. रवींद्र शिंदे शिवसेनेतून भाजप पक्षात गेल्यानंतर शिवसेनेच्या ऊबाठा जिल्हाप्रमुख पदासाठी रस्सीखेच चालू झाली आहे. विदर्भ संपर्क प्रमुख कदम यांनी जिल्ह्यातील अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे सादर केला आहे. येत्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पक्षाला स्थिरत्व प्राप्त करून देण्यासाठी योग्य जिल्हा प्रमुखाची निवड होणे शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शिवसेनेतील आक्रमक बाणा कोणत्या नेत्याकडे आहे . जनसामान्याचे काम कोण करू शकते. कट्टर शिवसैनिक कोणत्या जिल्हाप्रमुखांना पसंती दाखवतो या सर्व बाबींकडे लक्ष देऊन शिवसेना नेते चंद्रपूर जिल्ह्यातील रणनीती आखात आहे.
मात्र बरेच दिवसे लुटूनही शिवसेनेसाठी जिल्हाप्रमुख पद अजून पर्यंत रिक्तच आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या एकत्रीकरणासाठी जिल्हाप्रमुख म्हणून राजू महाजन नावाचा विचार केला जात आहे. मात्र हे नाव कट्टर शिवसैनिकांना कितपत पचनी पडेल हे सांगणे कठीण आहे.
***********
राजू महाजन यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेखनीय अहवाल: राष्ट्रवादी, भाजप ते शिवसेना
स्थानिक नेते राजू महाजन यांनी तीन प्रमुख राजकीय पक्षांतर्गत केलेला समर्पक प्रवास आणि सातत्याने मिळवलेली यशस्वी निवडणूक निकालांनी गोंधळलेल्या राजकारणात एक नवीन अध्याय लिहिला आहे.
प्रारंभिक कारकीर्द:
राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून महाविद्यालयीन स्तरावर निवडणुका ताकदीने लढवल्या.
वरोरा नगरपालिका निवडणुकीत पत्नीला राष्ट्रवादी तिकिट मिळवून दिले आणि त्या **नगरसेविका** म्हणून निवडून आल्या.
भाजप सामील होणे आणि यश
- राष्ट्रवादीत पक्षभेदामुळे उद्भवलेल्या वादानंतर खासदार हंसराज अहिर यांच्या आमंत्रणावरून भाजपमध्ये प्रवेश. - **तालुका महामंत्री** म्हणून नियुक्ती मिळाली.
- पत्नी भाजपतर्फे वरोरा नगरपालिकेच्या **एकमेव विजयी उमेदवार** ठरल्या आणि राजू महाजन यांना **स्वीकृत सदस्य** पद आपल्या पदरात पाडून घेतले.
- नंतर त्यांना **भाजप तालुका संघटक** पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
शिवसेना प्रवेश आणि ऐतिहासिक यश
- शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बाळूभाऊ धानोरकर यांच्या "आक्रमक आंदोलनशैली" आणि "न्यायदानाच्या ध्येयाने" प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला.
- पक्षाच्या आदेशानुसार **वरोरा नगरपालिका निवडणूक प्रभारी** म्हणून काम पाहिले.
- या निवडणुकीत शिवसेनेतर्फे **९ उमेदवार निवडून आणले** आणि महाजन पुन्हा **स्वीकृत सदस्य** बनले.
हा सगळा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला असून या नावाचा विचार शिवसेना करीत असल्याची माहिती गुप्त सूत्रा मार्फत माहीत करण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन नावे पुढे येण्याची शक्यता आहे.
*******
Comments
Post a Comment