शिवसेनेच्या तीन विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या स्थगित; गैरवापर केल्यास कठोर कारवाईची चेतावणी *नवीन जिल्हाप्रमुख लवकरच जाहीर करणार.*

शिवसेनेच्या तीन विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या स्थगित; गैरवापर केल्यास कठोर कारवाईची चेतावणी  

 *नवीन जिल्हाप्रमुख लवकरच जाहीर करणार.* 

वरोरा : चेतन लूतडे -24/7/25

 मागील महिन्यात जाहीर झालेल्या वरोरा-भद्रावती, राजुरा आणि चिमूर विधानसभा भागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने स्थगित करण्यात आल्या आहेत. या आदेशानंतरही  जो कोणी या पदांचा किंवा नियुक्ती पत्राचा (लेटरचा) गैरवापर करताना आढळेल, त्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्या व्यक्तीला पदापासून ताबडतोब वंचित करण्यात येईल, असे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी स्पष्ट केले.  

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या या अंतिम आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे सूचित केले असून, आपल्या पदाचा कोणीही अधिकृत घोषणेपूर्वी वापर करू नये याची काळजी घेण्यात यावी, अशी आदेश देण्यात आले आहे. 
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार, गेल्या ५ जून २०२५ रोजी *'सामना'* वृत्तपत्रातून या विधानसभा भागांसाठी पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. तथापि, अलीकडील बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण नियुक्त्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गिर्हे यांनी पत्रकारांना आश्वासन दिले की, *"येणाऱ्या काही दिवसांतच या विधानसभा भागांसाठी लवकरच  नव्याने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येतील."*  

ही महत्त्वाची घोषणा आज वरोरा येथील विश्रामगृहात जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी आयोजित केलेल्या पत्रकारांना आस्वस्थ केले की , विदर्भ संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्या अहवालानुसार गेलेल्या नावातूनच निवड कट्टर शिवसैनिकाची निवड करण्यात येईल .  पक्षाच्या अंतर्गत शिस्तप्रक्रियेचा हा निर्णय महत्त्वाचा ठरत असून, पदनियुक्तीच्या प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्याचा हा प्रयत्न आहे.

विश्राम गृह वरोरा येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कट्टर शिवसैनिकांनी या क्षेत्रातील अहवालात नमूद नमूद केलेल्या नावावरती शिक्कामोर्तब करावा . बाहेरचा उमेदवार शिवसैनिकावर  जिल्हाप्रमुख म्हणून पुन्हा लादल्यास  पुन्हा पक्ष फुटीची भीती शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.

यावेळी पत्रकार परिषदेसाठी जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, कट्टर शिवसैनिक दत्ता बोरेकर, मनीष जेठांनी, वैभव डहाणे, बंडू डाखरे, अमित निब्रड, गणेश जानवे आधी कट्टर शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

वरोरा विधानसभा हा शिवसेनेचा गड राहिलेला आहे. जुने शिवसैनिक हे आक्रमक होते. मात्र काही वर्षात हा पिंड बदलला गेला. रवींद्र शिंदे यांच्या काळात एकही आंदोलन झाले नाही. त्यामुळे शिवसेना कमजोर पडली होती . त्यामध्ये सुद्धा दोन गट असल्याने  विधानसभेची सीट गमवावी लागली. मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात शिवसेनेचे मतदार असून याचा फायदा भाजपला झाला. पुन्हा एकदा शिवसेनेत पोकळी निर्माण झाली असून जिल्हाप्रमुख पद आक्रमक कट्टर शिवसैनिकाला मिळावा अशी अपेक्षा शिवसैनिकांनी केली आहे.

Comments