काळे फासणाऱ्या इसमाचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेरात कैद .अज्ञात इसमाविरुद्ध पोलीसात तक्रार दाखल.


काळे फासणाऱ्या इसमाचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेरात कैद .

अज्ञात इसमाविरुद्ध  पोलीसात तक्रार दाखल.

वरोरा 
चेतन लूतडे 

     शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबई येथील भाजप पक्षात प्रवेश  केल्यानंतर  चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसैनिकात असंतोष पसरला आहे.
 
        रवींद्र शिंदे यांचे वरोरा येथील शहीद डाहूले स्मारक चौकात शिवालय नामक जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेर भिंतीवर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य तैलचित्र लावण्यात आले असून त्याच्या बाजूला जिल्हाप्रमुख म्हणून रवींद्र शिंदे यांचाही फोटो आहे. आज 16 जुलै रोज गुरुवारला  सकाळी रवींद्र शिंदे यांच्या फोटोला काळा रंग फासून त्याखाली गद्दार लिहिले असल्याचे निदर्शनास आले.
वरोरा शहरात या आधी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख नेमणे असून त्यासाठी दहा ते पंचवीस लाख रुपये द्यावे लागेल. यासाठी राऊत नामक व्यक्तीशी संपर्क करावा अशा आशयाचे वादग्रस्त फलक शहरात लावण्यात आले होते.
या दोन प्रकारच्या घटनेमुळे  काही दिवसात राजकीय वातावरणात तापले  असून. कट्टर शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

यादरम्यान रवींद्र शिंदे यांच्या कार्यालयासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लागून असल्याने ही घटना कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.  मध्यरात्रीच्या दरम्यान एका इसमाने चेहऱ्यावर लाल दुपट्टा लावून  चेहऱ्यावरती काळा रंग  लावल्याचे उघड झाले आहे. या इसमाचा पोलीस शोध घेत असून वरोरा पोलीस पुढील तपास करीत आहे.


शिवसेना नेते विदर्भ संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांनी लगेच बैठक घेऊन या संबंधातील प्रश्नावर चर्चा करून लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख पदासाठी नावे मागितली असून त्याचा अहवाल वरिष्ठ नेत्यांना देण्यात  येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
....................

Comments