शेगावमध्ये पितृहत्या: मुलाने वडिलांवर कुऱ्हाडीचे घाव घालून केली हत्या"
*वरोरा (शेगाव बु):* वरोरा तालुक्यातील शेगाव बु येथे एका मुलाने आपल्या वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला करून जागीच ठार केले. ही भीषण घटना विठ्ठल मंदिर वॉर्डमध्ये आज सकाळी घडली.
सकाळी अंदाजे ११ वाजता आरोपी अभय गुलाब दातारकर (वय ३४) याने त्याचे वडील गुलाब पत्रुजी दातारकर (वय ५८) यांना घरी बसले असताना कुऱ्हाडीने एकापाठोपाठ वार करून ठार केले. हल्ल्याच्या वेळी घरात इतर कोणीही हजर नव्हते. स्थानिक रहिवाशांना घटनेची खबर मिळताच त्यांनी शेगाव पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी पोलिस दल त्वरित पोहोचले. त्यांनी आरोपी अभय दातारकरला अटक केले आहे. प्राथमिक चौकशीनुसार, वडील-मुलामध्ये काही कारणाने वाद झाला असावा, परंतु हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणाची पोलिस तपासणी शेगावचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वात PSI सुमित कांबळे, ASI दिनकर घोटेकर, मदन येरणे, निखिल कौरासे, छगन जांभुळे, दिनेश ताटेवार, पोलिस शिपाई संतोष निषाद, प्रशांत गिरडकर, प्रगती भगत यांच्या सहकार्याने चालू आहे.
या क्रूर घटनेमुळे शेगावमध्ये स्तब्धता पसरली आहे. पोलिसांनी आरोपीवर गंभीर आरोप नोंदवून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
Comments
Post a Comment