*राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा माणूस घडविण्याचे केंद्र: सागर अहेर* *वरोडा शाखेच्या गुरुपौर्णिमा उत्सवात केले प्रतिपादन*
*वरोडा शाखेच्या गुरुपौर्णिमा उत्सवात केले प्रतिपादन*
वरोडा : श्याम ठेंगडी
कोणतीही अपेक्षा न ठेवता राष्ट्रकार्य निस्वार्थपणे करीत राहणाऱ्या स्वयंसेवकामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज शतकी वर्षात पोहचला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करताना हे मी केलं,असा भाव न ठेवता जे केलं ते राष्ट्रासाठीच केलं ही भावना यामागे आहे. संघाचा आपल्या शतकी वर्षात स्वभाषा, समरसता, कुटुंब व्यवस्था, पर्यावरण व नागरिक कर्तव्य या पंचसूत्रीवर भर असून सर्व सज्जनशक्ती सोबत घेऊन काम करायचे ही संघाची भूमिका आहे. आज अनुकूलता असली तरी संघकार्य सकारात्मक भूमिका घेऊन करण्याची गरज आहे. हे करत असताना समाजातील सर्व समस्यांचा विचार करून त्या पूर्ण करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चंद्रपूर विभाग सहप्रचारक सागर अहेर यांनी मांडले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरोडा शाखेच्या 10 जुलै रोज गुरुवारला झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी तालुका संघचालक सुनील सरोदे, नगर संघ चालक मनोज रेलकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
संघाचा स्वयंसेवक हा संघाच्या दैनिक शाखेतून घडतो. शाखा ही व्यक्ती निर्माण करण्याचे केंद्र आहे. शतकी वर्षात हिंदुत्व म्हणून पोहोचलो नाही असा एकही परिवार राहणार नाही असे सांगत स्वयंसेवकांनी आपल्या कार्यातून फेक नॅरेटिव्ह पसरविण्या-यांना चांगल्या व खऱ्या नॅरेटिव्हची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
. कार्यक्रमाच्या सुरुवातीला परमपूजनीय भगवा ध्वजाचे पूजन झाल्यानंतर *चलो जगाये विश्व शक्ती संघटित होकर* हे समूहगीत सादर करण्यात आले. आशिष हरणे यांनी हिंदू संस्कृतीत गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले तर मदन पांडे यांनी सुभाषित तर चिन्मय खंते यांनी अमृत वचन सादर केले. युवराज शेंडे यांनी *मातृ मंदिर का समर्पित दीपसे, चाह मेरी यह की मै जलता रहू* हे वैयक्तिक गीत सादर केले. प्रार्थनेनंतर प्रसाद वितरणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment