*दारूच्या ड्युटीमध्ये दिडपट वाढीविरुद्ध तहसील कार्यालयात निवेदन सादर*
चेतन लूतडे
वरोरा, १४ जुलै २०२५
– महाराष्ट्र सरकारने २५ जून २०२५ रोजी उत्पादन शुल्क (ड्युटी) मध्ये दिड पट वाढ केल्यामुळे वरोरा तालुक्यातील रेस्टॉरंट आणि बार मालकांनी आज संपूर्ण दिवस बंद पाळून प्रतिकार व्यक्त केला. या निर्णयामुळे परमिट रुमवर तिहेरी करभार (१०% VAT, १५% फी व ड्युटी 150%) पडल्याचे सांगून, वरोरा रेस्टॉरंट आणि बार असोसिएशनने शासनाला त्वरित ही वाढ रद्द करण्याची मागणी केली आहे.
१.अवैध व्यापाराला चालना: करवाढीमुळे दारूचे भाव वाढून ,ग्राहक इतर राज्यांतून मद्य मागविणे किंवा नकली/अवैध माल वापरणे सुरू झाले आहे. यामुळे सरकारच्या महसुलात घट होत आहे.
२.सीमा चेकपोस्टची मागणी: राज्याच्या सीमेवर उत्पादन शुल्क चेकपोस्ट उघडावेत, जेणेकरून परराज्यातील दारू महाराष्ट्रात येऊ नये. मेट्रो रिजन मध्ये येणाऱ्याचा परवाना फी ही शहरानुसार असावी.
३.विदेशी दारूवर निर्बंध: विमानातून येणाऱ्या प्रवाशांना परदेशी दारू आणण्यास मनाई करावी, ज्यामुळे स्थानिक बाजारपेठेचा फायदा होईल.
४. ग्रामीण भागात समस्या: ग्रामीण भागात वाईन शॉप्सचा अभाव असल्याने ग्राहकांना जास्त भाव द्यावे लागत आहेत. अवैध दारु निर्मातीवर, विक्रीवर, अवैध ठिकाणी मद्य पिण्यास कडक धोरण अवलंबावे.
या सगळ्या घटनांचा प्रभाव रेस्टॉरंट व बार मध्ये काम करणाऱ्या लहान कामगारावर पडत असून बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहणार आहे.
*आंदोलनाचे स्वरूप**
आज वरोरा तालुक्यातील सर्व परमिट रुम बंद ठेवून, असोसिएशनचे सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय पर्यंत मोर्चा काढून तहसीलदार व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
या आंदोलनाला बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास नेरकर , राजूभाऊ महाजन, प्रवीण काकडे, शुभम चिमूरकर, अक्षय सोनटक्के, यासह अनेक बार हॉटेल व्यवसायीक आणि कर्मचाऱ्यांरी उपस्थित होते. या एक दिवशीय आंदोलनासाठी शहरातील बार बंद ठेवण्यात आले आहे. असोसिएशनने माध्यमांमार्फत हा विषय राष्ट्रीय स्तरावर नेण्याचाही आग्रह धरला असून येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे.
जाहिरात
Comments
Post a Comment