शेगाव बु मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; ३ जणांना पोस्को कायद्याखाली अटक*

*शेगाव बु मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; ३ जणांना पोस्को कायद्याखाली अटक*  

शेगाव बु., चंद्रपूर, १२ जुलै २०२५ 

शेगाव बु पोलीस स्टेशन हद्दीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल केल्याची माणुसकीला काळीम फासणारी घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी आणि तिच्या वडिलांनी ११ जुलै रोजी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ही घटना प्रकाशात आली.  

घटनेची तारीख:** २४ मे २०२५ (तक्रार नंतर उघडकीस आली)  
-*अटक केलेले आरोपी:
  १. स्वप्निल राजकुमार गुर्जनवार  
  २. गणेश राजेंद्र विश्रामकर (दोघेही पवनगाव, वर्धा)  
  ३. रोहन गजानन विश्रामकर (चंद्रपूर)  

कायदेशीर कारवाई:
  - भारतीय दंड संहिता कलम ७०(२), १२३  
  - पोस्को कायदा कलम ४, ६  
  - आयटी कायदा कलम ६६(ई), ६७(अ)  

चंद्रपूर पोलीस अधीक्षकांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक राकेश जाधव  प्रकरणाची चौकशी करीत आहेत.  


Comments