वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

पालकमंत्री 5 जुलै रोजी चंद्रपुरात*

*पालकमंत्री 5 जुलै रोजी चंद्रपुरात*

चंद्रपूर, दि. 4 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे 5 जुलै रोजी चंद्रपूर येथे येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

5 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीव, सकाळी 11.30 वाजता नियोजन भवन येथे पीएम जनमन व धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानचा आढावा तसेच 100 दिवस कार्यालयीन सुधारणा मोहिमेंतर्गत निवड झालेल्या कार्यालयांना प्रशस्तीपत्र प्रदान कार्यक्रम, दुपारी 12 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान कार्यक्रमाला उपस्थिती, दुपारी 2 वाजता ज्युबली हायस्कूल चंद्रपूर येथे चांदा ज्योती सुपर 100 अभ्यासिका वर्गाचे उद्घाटन, दुपारी 4 वाजता माता कन्यका सभागृह, बाजार वॉर्ड चंद्रपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणा-या सेवा सप्ताह कार्यक्रमासंदर्भात आढावा बैठकीस उपस्थित, सायंकाळी 6 वाजता यवतमाळकडे प्रयाण.

०००००

Comments