*भद्रावती नगरपरिषदेवर जप्तीचा धक्का! 49.25 लाख भाडे बकाया, न्यायालयीन कारवाईने कारभारावर प्रश्नचिन्ह*
*भद्रावती नगरपरिषदेवर जप्तीचा धक्का! 49.25 लाख भाडे बकाया, न्यायालयीन कारवाईने कारभारावर प्रश्नचिन्ह*
आमदार करण देवतळे विधानसभेत गरजले.
पारितोषिक प्राप्त नगरपालिकेचा प्रश्न विधानसभेत
चेतन लूतडे
भद्रावती : नगरपरिषदेच्या कार्यालयावर न्यायालयाने जप्तीची कारवाई केल्याने भद्रावतीत राजकीय व प्रशासकीय भूकंप झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजी मंडई , बाजारपेठेसाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या खासगी जागेचे ४९.२५ लाख रुपये भाडे बकाया राहिल्यामुळे न्यायालयाने जप्तीचे आदेश दिले होते. या आदेशानुसार ३० जून रोजी नगरपरिषद कार्यालयावर प्रत्यक्ष जप्तीची कारवाई झाली. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात दिसून येत आहे.
**नगरपरिषदेच्या कारभारावर शिक्का**
या प्रसंगामुळे नगरपरिषदेच्या आर्थिक व्यवस्थापनावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. "सामान्य नागरिकांना थोडासाही उशीर झाला तर त्यांच्यावर कडक कारवाई होते, पण येथे संपूर्ण नगरपरिषद कार्यालय जप्त झाले – ही स्थिती लाचारी आणि कुप्रशासनाची साक्ष आहे," असे स्थानिक नागरिक म्हणत आहेत.
**पूर्वाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप**
या बाबतीत विधानसभेत मांडणी करताना भद्रावती विधानसभेचे आमदार **करण देवतळे** यांनी माजी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. "पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून जनतेच्या पैशाची लूट केली. या संपूर्ण प्रकरणाची सर्वसमावेशक चौकशी होणे आवश्यक आहे," अशी मागणी त्यांनी केली.
*शासकीय जागा देण्याची मागणी*
भद्रावती नगरपरिषदेकडे स्वतःची पुरेशी जागा नसल्यामुळे, **मौजे भद्रावती येथील शासकीय जागा नगरपरिषदेला आगाऊ ताब्यात देण्यात यावी**, अशी विनंतीही शासनाकडे करण्यात आली आहे.
*शासनाला तातडीच्या उपाययोजनाची मागणी*
या संदर्भात आमदार देवतळे यांनी स्पष्ट मागणी केली आहे की, **"शासनाने तातडीने आढावा बैठक घेऊन योग्य उपाययोजना करावी, जेणेकरून नागरिकांच्या सेवेवर याचा परिणाम होऊ नये."*
ही बातमी नगरपरिषदेतील आर्थिक अनियमितता आणि प्रशासकीय दुर्लक्ष यावर प्रकाश टाकते. यामुळे भद्रावतीत राजकीय चर्चा तीव्र झाली आहे, तर शासनाच्या हस्तक्षेपाचीही वाट पाहिली जात आहे.
-----------
आठवडी बाजारासाठी शहरातील राजु गुंडावार, संजय गुंडावार व किशोर गुंडावार यांची ३० हजार ०३३ फुट जमीन २०१८ मध्ये भद्रावती नगरपरिषदने ६६ हजार रुपये प्रतीमहिणा भाडेतत्वावर घेतली होती.
नगर परीषदेजवळ रक्कम चुकती करण्यास पुरेसा पैसा नाही. ही रक्कम पाच टप्यांमधे चुकती करण्याचा प्रस्ताव गुंडावार यांना देण्यात आला. मात्र त्यांनी तो मान्य न करता जप्तीची कारवाई केली.
मुख्याधिकारी ,विशाखा शेळकी, भद्रावती नगर परिषद
जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा लिलाव करुन भाड्याची रक्कम जप्त करण्यात येईल. वसुली पुर्ण न झाल्यास आणखी साहित्य जप्त करण्यात येईल.
संजय गुंडावार ,जमिनमालक
Comments
Post a Comment