भद्रावती :
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपुर च्या कोषाध्यक्षा श्रीमती सुषमाताई शिंदे यांनी आज (दि.१५) ला त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोन भावंडांना शैक्षणिक दत्तक घेतले.
आज (दि.१५) ला ट्रस्टच्या कोषाध्यक्ष श्रीमती सुषमाताई शिंदे यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून ट्रस्टचे उपक्रम “सिंधूताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना” अंतर्गत स्थानिक जुना सुमठाना येथील श्रृतीका हरीष करमरकर व दक्ष हरीष करमरकर या भावंडाना शैक्षणिक दत्तक घेतले.
याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले तथा ईतर सहकारी उपस्थीत होते.
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) चंद्रपूर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात ट्रस्टच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्यक्रम सुरु असतात. गरीब, गरजू, अनाथ, वंचित आदींना जमेल तसे सहकार्य ट्रस्टच्या माध्यमातून केल्या जात असते. या सामाजिक कार्याचाच एक भाग म्हणून सुषमाताई शिंदे यांनी सदर उपक्रम केला.
Comments
Post a Comment