वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

*जिल्हाधिका-यांकडून विविध विकास कामांची पाहणी*

*जिल्हाधिका-यांकडून विविध विकास कामांची पाहणी*

चंद्रपूर, दि. 3 जून : राज्य शासनाने वरिष्ठ अधिका-यांना फिल्डवर जाऊन विकास कामांच्या प्रगतीचा आढावा तसेच नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.3) वरोरा तालुक्यातील विविध विकास कामांना भेट देऊन सदर कामांची पाहणी केली.

पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी विकास कामांच्या प्रगतीचे टप्पे व अडचणी आदीबाबत अधिकारी व नागरिकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे बांधण्यात येत असलेले महिला बचत गटाच्या वस्तू विक्री शॉपिंग मॉलला भेट दिली. रोजगार हमी योजनेतून वरोरा तालुक्यातील सालोरी येन्सा येथील प्रगतशील शेतकरी यांच्या रेशीम उत्पादन व मलबेरी प्लांटेशन केंद्र,  कॅम्पा निधीतून वन विभागद्वारे टेमुर्डा येथे राबविण्यात येणारे चारा गवत विकास प्रकल्प, नगर परिषद वरोरा व अंबुजा फाउंडेशन यांच्याद्वारे करण्यात येत असलेले वरोरा शहरातील गांधी सागर तलाव खोलीकरण कामाची पाहणी पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिका-यांसोबत उपविभागीय अधिकारी अतुल जटाळे, तहसीलदार योगेश कौटकर, नगर परिषद मुख्याधिकारी विशाखा शेळकी, कनिष्ठ अभियंता श्री. खणके, वन परिक्षेत्र अधिकारी श्री. शेंडे , मंडळ कृषी अधिकारी श्री. काळे व इतर अधिकारी उपस्थित होते.

*भद्रावती तालुक्याला सुध्दा भेट :* जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भद्रावती तालुक्यातील कार्यकारी सहकारी संस्था येथे भेट दिली. तसेच पळसगाव येथील पूर पूर्व परिस्थितीची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली. भद्रावती तालुक्यातील मौजा कुचना येथील जिल्हा परिषद शाळेची यावेळी त्यांनी पाहणी केली.

Comments