वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

ट्रॅक्टर खाली दबून युवकाचा मृत्यू*करंजी रेती घाटावर वाहतूक करताना घडली घटना

*ट्रॅक्टर खाली दबून युवकाचा मृत्यू*
करंजी रेती घाटावर वाहतूक करताना घडली घटना

वरोरा:- तालुक्यातील सात किलोमिटर अंतरावर असलेल्या करंजी या रेती घाटावर ट्रॅक्टर मागे आल्याने ट्रॅक्टर खाली दबून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 6जुन रोजी चार वाजता सुमारास घडली आशिष देवराव बोढे, वय 26 असे मृतकाचे नाव आहे.
करंजी रेती घाटावर असलेली रेती महसूल विभागाकडून काही दिवसा आधी जप्त करण्यात आली होती ही रेती शासनाने घरकुल धारकांना वाटप करण्यात येत आहे.या रेतीची वाहतूक करण्यासाठीं घरकुल धारक ट्रॅक्टर किरायाने घेऊन वाहतूक करीत आहे, काल दुपारी चार वाजता सुमारास एक ट्रॅक्टर रेती भरून रेती घाटातून निघत नसल्याने विजय ठेगणे यांच्या ट्रॅक्टर वरील आशिष देवराव बोढे वय 26हा ट्रॅक्टर काढण्यासाठी गेला असता ट्रॅक्टर ची ट्रॉली तुटल्याने ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटले व त्या खाली युवक गंभीर रित्या जखमी झाला त्यास त्वरीत उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आला मात्र रात्री 11वाजता त्याचा मृत्यू झाला. सादर ट्रॅक्टर हे टेमुर्डा येथील विक्की साळवे याच्या मालकीचे आहेत, पुढील तपास पोलीस स्टेशन वरोरा चे अधिकारी करीत आहे.

Comments