वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

रात्रीच्यावेळी अवैध रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियाची मुजोरी सहन केली जाणार नाही.सुर्या अडबाले .

रात्रीच्यावेळी अवैध रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियाची मुजोरी सहन केली जाणार नाही.
सुर्या अडबाले .

वरोरा 
चेतन लूतडे 

चंद्रपूर जिल्ह्यातील 48 रेती घाट लिलाव झाल्यानंतर रेती घाट धारक रात्रीच्या वेळी अवैध रेती वाहतूक होतं असल्याने शेतकऱ्यांना रेती माफिया धमकी देत आहेत. रस्ते खराब होऊन गावाकऱ्यांना रात्रीचा रेती वहन करणाऱ्या गाड्यांचा त्रास होतं असल्याने यावर त्वरित प्रतिबंध काढण्याबाबत निवेदन सादर केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास 48 रेती घाट लिलाव होऊन रेती उत्खनन सुरु आहे, पण ज्या नियम व अटी शर्ती नुसार रेती घाट लिलाव करण्यात आले ते सगळे नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे रेती उत्खनन करण्यात येतं आहे व रेतीची रात्रीच्या वेळेस अवैध वाहतूक होतं आहे,

येत्या 10 जून 2025 पर्यंत सगळ्या रेती घाटातून रेती उत्खनन सुरु असून सध्या रेतीचा स्टॉक करत असल्याचे दाखवीन्यात येतं आहे. मात्र प्रत्यक्षात दिवसारात्र नदी घाटातून रेती उत्खनन होऊन रेती खुल्या बाजारात चढ्या भावाने विकल्या जात आहे, दरम्यान दिवसारात्र चालणाऱ्या रेती गाड्या शेतकऱ्यांने विरोध केला तर त्यांना घाबरवण्याचे काम रेती माफिया करत आहेत. अशाच अवैध रेती उत्खनना मुळे चंद्रपूर जिल्यातील खून व मोठे गुन्हे आधी पण झाले असून गावातील पांदन रस्ते खराब करत तर आहेच शिवाय रात्रीच्या वेळी काही गावगुंड हत्यार घेऊन रात्रीच्या वेळी दहशत पसरवत असल्याने व दिवसरात्र चालणाऱ्या रेती च्या गाड्यांमुळे रात्रीच्या वेळी कित्तेकांची झोपमोड होतं असून जनजीवन जणू विष्कळीत होतं असल्यामुळे आपण त्वरित यावर प्रतिबंध लावावा व रेती माफिया कडून होत असलेली शेतकऱ्यांवर दादागिरीची भाषा सहन करणार नाही यावरती लवकरात लवकर प्रतिबिंब लावण्यात आले नाही तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वराज्य शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जन आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

करिता चंद्रपूर जिल्ह्यातील त्वरित अवैध रेती उत्खनन करणाऱ्या ठेकेदार व त्यांची कंपनीला दिलेली परमिशन कॅन्सल करावी व दोषी वरती कठोर कारवाई करून संबंधितावर गुन्हे दाखल करावे  अशी मागणी  सूर्या अडबाले  संस्थापक स्वराज्य शेतकरी संघटना चंद्रपूर च्या वतीने करण्यात आला आहे.
या संदर्भातील प्रतिलीपी जिल्हा खनीकर्म अधीकारी, चंद्रपूर , पोलीस अधीक्षक साहेब, चंद्रपूर , विभागीय अधिकारी साहेब.चंद्रपूर, तहसीलदार साहेब.चंद्रपूर यांना देण्यात आले आहे.




Comments