स्त्रीशक्तीचा जयघोष, समानतेचा नवा प्रकाश!कोरपना येथे जागतिक महिला दिनानिमित्त 'महिला सन्मान सोहळा' उत्साहात संपन्न

स्त्रीशक्तीचा जयघोष, समानतेचा नवा प्रकाश! कोरपना येथे जागतिक महिला दिनानिमित्त 'महिला सन्मान सोहळा' उत्साहात संपन्न कोरपना (जि. चंद्रपूर), दि. १२ मार्च: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नगर पंचायत कोरपना आणि युवा प्रतिष्ठान, कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'महिला सन्मान सोहळा' काल मोठ्या उत्साहात पार पडला. नगराध्यक्षा माननीय सौ. नंदाताई विजयराव बावणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर मध्यवर्ती जिल्हा बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे होते. यावेळी व्यासपीठावर सुदर्शनजी निमकर, विजयराव बावणे, उत्तमराव पेचे (माजी सदस्य, जि.प.), नगराध्यक्षा नंदाताई बावणे, अशोक बावणे (सभापती, कृ.उ.बा.स.), सुरेश पा. मालेकार, उपनगराध्यक्ष इस्माईल शेख, प्रभाकर जि. गोडाम, भाऊजी चव्हाण, भारत चन्ने, पुंडलिक गिरसावळे, राहुल मालेकार, रसुल पटेल, जम्मु भाई, विवेक येरणे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते सिनेसृष्टीतील स...

*भूषण सलवटकर यांची बल्लारपूर येथे बदली* *वरोडावासीय एका प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यास मुकला*

*भूषण सलवटकर यांची बल्लारपूर येथे बदली*
   
 *वरोडावासीय एका प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यास मुकला*
 वरोडा : श्याम ठेंगडी 

    स्वच्छता निरीक्षक हे एक महत्त्वाचे सार्वजनिक आरोग्य पद समजल्या जाते.समाजाचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी महत्त्वाचे पद आहे. 
   वरोडा नगर परिषदेतील उत्तम सेवा देणारे स्वच्छता निरीक्षक भूषण सालवटकर हे सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावत. त्यांच्या कामाचा उद्देश नेहमी समाजात स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे हाच होता.
      वरोड्यासारख्या शहरात आपल्या कामाने लोकप्रिय झालेल्या भूषण सालवटकर यांची बदली नुकतीच बल्लारपूर येथे झाली.यामुळे वरोडावासीय एकाच चांगल्या कर्मचाऱ्यास मुकल्याची भावना वरोडा वासियांमध्ये निर्माण झाली आहे.
      पहाटे पाच वाजेपासून आपल्या कार्यावर हजर असणारे सालवटकर हे उत्तम नियोजन करण्यात तरबेज समजले जात. कोणताही कार्यक्रम चांगला कसा करता येईल यावर त्यांचा नेहमीच नियोजनात भर असे.
     आपल्या कार्यावर हजर झाल्यानंतर गल्लोगल्ली स्वतः  फेरफटका मारत व स्वच्छतेची कोठे गरज आहे हे पाहून कामाला प्राधान्य देत.
        कोरोना काळात त्यांनी महामारीने मृत्यू पावलेल्या अनेक नागरिकांच्या पार्थिवावरअंतिम संस्कार केले. शहरात कोठेही मोकाट जनावरे, मांजर,बैल, कुत्रा यासारखे प्राणी दगावले तर नागरिक त्यांना संपर्क करत.  नागरिकांच्या आलेल्या भ्रमणध्वनीवर त्वरित कारवाई करण्यास ते प्राधान्य देत.
        आपल्या मनमिळावू स्वभावामुळे ते नागरिकात व अधिकाऱ्यात प्रिय झाले होते. अशा या कर्तव्यदक्ष  कर्मचाऱ्यांची बदली बल्लारपूर येथे झाल्याने येथील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.


.         Happy Birthday Dr. Sagar vaze

Happy Birthday Mr.Shashibhau Choudhary 

Comments