वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

*जिल्हाधिका-यांनी घेतला जलजीवन मिशनचा आढावा*

*जिल्हाधिका-यांनी घेतला जलजीवन मिशनचा आढावा*

चंद्रपूर, दि. 17 : जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेचा, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.17) आढावा घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) प्रदीप बाराहाते, निलिमा मंडपे (जलसंधारण विभाग), संजय अष्टगी (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, सहायक प्रकल्प अधिकारी गिरीश पोळ उपस्थित होते.

जिल्ह्यातील नागरिकांना जलजीवन मिशन अंतर्गत 100 टक्के नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, ज्या योजना पूर्ण झाल्या असतील, त्यामधून पाणी सुरू होणे आावश्यक आहे. तरी सुध्दा भौतिकदृष्ट्या काही किरकोळ कारणाने सदर योजना रखडल्या असतील, तर त्या त्वरीत पूर्ण करून घ्या. महावितरणच्या कामामुळे पूर्ण न झालेल्या योजनांचा पाठपुरावा करावा. अर्धवट राहिलेल्या पाणी पुरवठा योजनांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतंत्र आढावा घ्यावा. त्याकरीता खनीज विकास मधून निधी देता येईल, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

यावेळी कार्यकारी अभियंता प्रदीप बाराहाते म्हणाले, ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत 1684 योजना असून यापैकी 1005 योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 833 योजनांमधून पाणी सुरू आहे. डिसेंबर 2026 पर्यंत उर्वरीत सर्व योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

०००००००

Comments