वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

पर्यावरण दिन-२०२५ चे औचित्य साधून जी एम आर वरोरा एनर्जी द्वारे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण.

पर्यावरण दिन-२०२५ चे औचित्य साधून जी एम आर वरोरा एनर्जी द्वारे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण.

वरोरा 

या वृक्षरोपण कार्यक्रमाचे मुख्य उद्देश्य सध्याचा बदलत्या पर्यावरण बदलात जनसामान्य व्यक्ती मध्ये जागरूकता निर्माण करणे व प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण बद्दल प्रामाणिक दायित्व पाळावे तसेच वर्तमान परिस्थितीत त्याकरिता वर्तमान परिस्थितीत प्लॅस्टिकच्या अति वापरामुळे पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेता प्लास्टिक वापर कमीत कमी करावा या उद्देशाने 'प्लास्टिक प्रदूषणाचा नाश करा' या प्रमुख विषयाला धरून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कंपनीचे सीओओ (थर्मल) श्री धनंजय देशपांडे यांनी कार्यक्रमात उपस्थित विभाग प्रमुख, अधिकारी व कंपनीतील कामगार बंधू याना संबोधित केले या वेळी वृक्षारोपण किंवा वृक्षारोपणाचे प्राथमिक उद्दिष्टे काय हे समजून सांगितले ते समोर म्हणाले कि पर्यावरण सुधारणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे आणि मानवी वापरासाठी संसाधने प्रदान करणे हे आपले प्रथम कर्तव्य असावे, सीओओ यांनी समोर म्हटले कि वृक्षारोपण हे हवेची गुणवत्ता सुधारण्यास, मातीची धूप कमी करण्यास आणि वन्यजीवांसाठी अधिवास निर्माण करण्यास मदत करते. तसेच लाकूड उत्पादन, वातावरणातील कार्बन प्रमाण कमी करणे आणि पर्यटनाद्वारे आर्थिक फायदे देखील प्रदान करते.

जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेडचे ध्येय व दूर दृष्टीकोन हे पर्यावणा सोबत खोलवर जुळलेली आहे, कंपनी चे उद्देश्य आहे कि वीज निर्मिती कारतेवेळी पर्यावरणावर कमीत कमी प्रभाव पडावा. याच वचनबद्धतेनुसार कंपनी द्वारे आजवर गेल्या दशकांमध्ये कंपनी परिसर, कंपनी वसाहत व आजू बाजू च्या गावामध्ये ४० टक्के उपलब्ध जमिनीचर वृक्षारोपण करून परिसर हरित करण्याचा उपक्रम हातात घेतला आहे.

या कार्यक्रमाला ६२० लोकांनी उत्साहाने भाग घेतला व इतर वृक्षांसोबत प्रामुख्याने २०२ चंदन ची रोपटे रोवण्यात आली. प्लास्टिक कचरा व पर्यावरण पुनर्संचयित करण्यावर उपस्थित लोकांनी वचनबद्धता दर्शवली. तसेच कार्यक्रमाला उपस्थित कंपनी येथील ३५० कामगारांना व ग्रीनवुड्स वसाहतीतील ४० कामगारांना वयक्तिक लागवडी करिता रोपटे प्रदान करण्यात आली.

कंपनीच्या या उपक्रमाद्वारे वातावरणातील अंदाजे ४.४ टन कार्बन (CO₂) दरवर्षी कपात अपेक्षित आहे, हे कंपनी द्वार उचललेले छोटेसे पाऊल पर्यावरणाला मोठी स्थिरता प्रदान करेल.


Comments