शिवसेना जिल्हाध्यक्ष व गावकऱ्यांचे पोलीस प्रशासनाला निवेदन अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करा. गावकऱ्यांकडून कडक कारवाईची मागणी

शिवसेना जिल्हाध्यक्ष व गावकऱ्यांचे पोलीस प्रशासनाला निवेदन 

अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करा. 

गावकऱ्यांकडून कडक कारवाईची मागणी


वरोरा 
चेतन लूतडे 

डोंगरगांव (रेल्वे), ता. वरोरा – तालुक्यातील डोंगरगाव (रेल्वे) या गावात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू असून, पूर्वी एकाच ठिकाणी होणारी ही विक्री आता तीन ठिकाणी खुलेआम होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या अवैध दारू विक्रीच्या अति सेवनामुळे गावातील तरुण बळी ठरत आहे . त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडत असून, त्यांच्या अल्पवयीन मुलांचे भवितव्य अंधारात गेले आहे.

गावातील सरपंच व महिला कार्यकर्त्यांनी या संदर्भात पोलिस विभागाला निवेदन दिले आहे. मात्र अजून पर्यंत अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर याचा काहीही फरक पडलेला नाही. गावात १६ वर्षांखालील अनेक मुले देखील व्यसनाधीन होत असल्याचे दिसून येत आहे, ही बाब अधिक गंभीर आहे.

शिवसेना पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्वरित लक्ष घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यामध्ये दारू विकणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडील दारूचे नमुने तपासणीसाठी पाठवून तिची वैधता तपासावी, अशीही सूचना करण्यात आली आहे. येत्या 15 दिवसांत प्रशासनाने गावातील अवैध दारू विक्री बंद न केल्यास शिवसेना स्टाईल बंद करण्यात येईल असाही इशारा दिलेला आहे.

गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून, त्यांनी संबंधित यंत्रणांकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. प्रशासनाकडून लवकरच योग्य ती पावले उचलली जातील, अशी अपेक्षा आहे.




Comments