बांद्रा येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; २ आरोपींवर गुन्हा दाखल

बांद्रा येथे अवैध दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; २ आरोपींवर गुन्हा दाखल बातमी:30/4/2026 वरोरा : तालुक्यातील बांद्रा येथे अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १,०८० रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ एप्रिल रोजी पोलिस पथक पेट्रोलिंगदरम्यान असताना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, बांद्रा येथील सुरज उमेश दोहतरे हा आपल्या घरी अवैधरित्या देशी दारू साठवून विक्री करीत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह संबंधित ठिकाणी धाड टाकली. कारवाईदरम्यान सुरज दोहतरे घरी नसल्याने त्याची पत्नी वनिता सुरज दोहतरे (वय २७) हिची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी पंचासमक्ष घरझडती घेतली असता स्वयंपाकघरातील भांड्याखाली कापडी पिशवीत ९० एम.एल.च्या ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या २७ बाटल्या देशी दारू आढळून आल्या. सदर दारूबाबत कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. नमुना म्हणून एका बाटलीला सील करून रासायनिक विश्लेषणासा...

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना अंतर्गत विद्यार्थिनीस शैक्षणिक मदत प्रदान*


*डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना अंतर्गत विद्यार्थिनीस शैक्षणिक मदत प्रदान*

भद्रावती :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजनेअंतर्गत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे.

याच उपक्रमाअंतर्गत डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅमन्ड रिसर्च, नागपूर येथे B.Com (CA) द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या कु. वैष्णवी मोरेश्वर तराळे हिला शैक्षणिक शुल्कासाठी आर्थिक मदत करण्यात आली.

या प्रसंगी जिल्हा प्रमुख मा. रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले व तालुका प्रमुख नंदू पढाल यांच्या हस्ते कु. वैष्णवी हिला धनादेश प्रदान करण्यात आला.

मा. रविंद्र शिंदे यांचे सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे कार्य आज प्रत्येकाच्या नजरेत भरते आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी नेहमी धावून जाणारे त्यांचे व्यक्तिमत्व विद्यार्थी वर्गात एक प्रेरणास्रोत म्हणून समोर आले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेकांना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत.

"आपला माणूस" म्हणून जनतेच्या मनात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते सातत्याने कार्यरत असून, अशा व्यक्तिमत्त्वाचा आधार लाभणं हे समाजासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने भाग्याचे लक्षण आहे.

Comments