*शालांत परीक्षेत शंभर टक्के गुणाने उत्तीर्ण*
वरोडा :
मूळचे वरोडा येथील रहिवासी असलेले व व्यवसाया निमित्य पुणे येथे स्थायिक झालेले प्रसाद नामजोशी यांची कन्या रावी प्रसाद नामजोशी हिने नुकत्याच जाहीर झालेल्या शालांत परीक्षेच्या निकालात शंभर टक्के गुण मिळविले आहे हे विशेष.
रावी नामजोशी आपल्या आई-वडिलांसह वरोडा येथे आली असतांना येथील नामजोशी परिवार प्रेमी नागरिकांनी तिचे स्वागत केले.
आज सर्वत्र इंग्रजी माध्यमाचे क्रेज असताना रावीने पुणे येथील सदाशिव पेठेतील गोळवलकर गुरुजी विद्यालयातून मराठी माध्यमातून शालांत परीक्षा दिली व तिने हे यश हे विशेष.
स्वागत सोहळ्यानंतर हसतमुख असलेल्या रावीला एवढे भव्य यश मिळेल ही अपेक्षा नव्हती. या यशामुळे आपणास आनंद झाला असून संशोधन क्षेत्रात आपणास करियर करायचे असल्याचे तिने सांगितले.
कोणत्याही विषयाची शिकवणी न लावता आपण हे यश मिळाले असून अभ्यासातील सातत्य हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे तिचे म्हणणे आहे. अभ्यासाबरोबर तिला खेळाची ही आवड आहे.
रावीचे वडील प्रसाद नामजोशी हे मराठी चित्रपट दिग्दर्शक आहेत तर तिची आई ही शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. तिच्या या भरीव यशाबद्दल नामजोशी परिवाराशी संबंधित नागरिकात आनंद व्यक्त होत असून तिचे कौतुक केले जात आहे.
शहरातील एक ख्यातनाम वकील म्हणून नामजोशींचे नाव होते. त्यानंतर त्यांचे चिरंजीव राम नामजोशी हे देखील हे येथील लोकमान्य विद्यालयात संस्कृत शिक्षक म्हणून कार्यरत होते. संस्कृत भाषेची चळवळ त्याने पन्नास वर्षांपूर्वी शाळेतून चालवली. अनेक विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेची गोडी व ओळखही त्यांच्यामुळेच झाली.
यावर्षी महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षेत महाराष्ट्रातून शंभर टक्के गुण घेणारी रावी प्रसाद नामजोशी ही त्यांचीच नात. अत्यंत काटेकोर जीवन व तत्वनिष्ठ जीवनशैली ही या नामजोशी कुटुंबाची खासियत. प्रसाद, यामिनी, कल्याणी ही त्यांची मुलेही अत्यंत हुशार. स्वकष्टाने व स्व बुद्धीने जगणारे हे कुटुंब.
रावी नामजोशीने मिळविलेल्या या यशाने या कुटुंबावर एक रोशनी तुरा उमटविला. अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी हे या सर्वांचे यशाचे गमक होय.
Comments
Post a Comment