अहेतेशामभाऊ अली यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीने साजरा!

अहेतेशामभाऊ अली यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीने साजरा!

वरोरा 
चेतन लूतडे वरोरा 
अहेतेशाम अली मित्र परिवार वरोरा - भद्रावती विधानसभा क्षेत्र यांचा वतीने आलिशान लॉन, वरोरा  येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.
रक्तदानाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करून सर्वांनी समाजसेवेची भावना जागवली. "रक्तदान हेच श्रेष्ठ दान" ही विचारधारा मनात ठेवत ८१ लोकांनी रक्तदान केले.अनेक कार्यकर्ते, जनसामान्य नागरीक,सर्व रक्तदात्यांनी रक्तदान करून अहेतेशाम अली, माजी नगराध्यक्ष न.प.वरोरा यांचा वाढदिवस समाजोपयोगी कार्यातून साजरा केला. या प्रसंगी अहेतेशाम अली यांनी रक्तदान शिबिर आणि अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमात अनेकांनी हजर राहून शुभेच्छा दिल्या. व रक्तदान करून या सामाजिक कार्यात मोलाचा सहभाग दिल्याबद्दल  सहभागी मान्यवरांचे मनापासून आभार म्हणले..! या कार्यक्रमात सादिक अली,आतिश बोरा,कादर शेख,अरविंद खोकले,वसीम शेख,विजय धोपटे,सुनील हलमारे, बाबू शेख,पवन वरघने,विजय लांबट, इकलाख रंगरेज,रीना पेंद्रे, निखिल श्रीरामे,अजहर खान,महेश कपाटे,शकील शेख,राजू फेथफुलवार,आशुतोष बोस, शोएब शेख, यांचा अथक प्रयत्नांनी हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

Comments