वरोरा
श्री संत गजानन गाथा वरोरा शहरात
वरोरा श्री संत गजानन महाराज भक्त परिवार वरोराच्या वतीने ८ जून रोज रविवारला श्री संत गजानन गाथा अमृतकन कार्यक्रमाचे आयोजन p0सकाळी दहा वाजता वानखेडे सेलिब्रेशन वणी बायपास रोड येथे करण्यात आले आहे
श्री संत गजानन महाराज भक्त परिवार वरोराच्यावतीने वरोरा शहरात दरवर्षी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री ची उपासना होत असते यावर्षी श्री संत गजानन महाराज बावन्नीचे रचयीते मुंबई येथील प्राध्यापक सुरेश ग शेवडे यांचा अमृतकनश्री संत गजानन गाथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे प्राध्यापक शेवडे धर्मभूषण भारताचार्य व्याख्यान प्रवचन रत्नआदर्श शिक्षक पुरस्कार आदर्श कीर्तनकार ईत्यादि पुरस्काराने विभूषित आहे प्राध्यापक शेवडे यांनी देश विदेशात अनेक व्याख्याने दिले आहेत अमेरिकेमध्ये ५५० कार्यक्रम त्यांनी केले आहेतश्री संत गजानन महाराज शेगाव येथे सलग 28 वर्ष बारा दिवसाचे प्रवचन प्राध्यापक शेवाळे यांनी केले आहेअशा थोर विभूतीच्या रसाळ व अधिकार वाणीतून श्री च्या गाथेचे अमृत आपणास मिळणार आहे या कार्यक्रमास विदर्भातील अनेक गजानन भक्त उपस्थित रहाणार आहेत
आठ जून रोजी सकाळी सात वाजता पादुका अभिषेक व पूजन तसेच उल्हासनगरचे बाळकृष्ण कुळसंगे आपले अनुभव कथन करणार आहे
पादुका नगर परिक्रमा
सात जून रोज शनिवारला वरोरा शहरात सायंकाळी सहा वाजता पादुका नगर परिक्रमाकरण्यात येणार आहे श्री संत गजानन महाराज मंदिर टागोर नगर येथून सुरुवात होणार असून सपाटे चौकविर सावरकर चौक डोंगरावर चौक मित्र चौक एकार्जुना रोड वानखडे सेलिब्रेशन वणी बायपास रोड वरोरा येथे समारोप करण्यात येणार आहे
आठ जूनरोज रविवारला प्राध्यापक शेवडे यांचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या सर्व कार्यक्रमाचा वरोरा व परिसरातील नागरिकांनी सहकुटुंब सहभाग घ्यावा असे आव्हान श्री संत गजानन महाराज वरोरा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे
Comments
Post a Comment