*दिव्यांग बांधवासाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव**“हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना” अंतर्गत तीनचाकी सायकलचे वाटप*



*दिव्यांग बांधवासाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव*
*“हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना” अंतर्गत तीनचाकी सायकलचे वाटप*

भद्रावती :
भद्रावती तालुक्यातील माजरी वस्ती येथील अपघातात दिव्यांग झालेले श्री. मंगेश नागोराव लांडगे यांना “हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना” अंतर्गत तीनचाकी सायकल प्रदान करण्यात आली. हा उपक्रम स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.

दिव्यांग बांधवांच्या जीवनात स्वावलंबनाची भावना निर्माण व्हावी व त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी व्हाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम साकारण्यात आला आहे. श्री. मंगेश लांडगे यांना सायकल प्रदान करताना परिसरातील नागरिकांनीही या कार्याची प्रशंसा केली.

रवींद्र शिंदे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वीही विविध उपक्रम – गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आरोग्य शिबिरे, आपत्ती काळात मदतीचे कार्य – यशस्वीरीत्या राबवण्यात आले आहेत.

“जनतेतला आपला माणूस” म्हणून ओळख असलेल्या रवींद्र शिंदे यांनी प्रत्येक संकटसमयी जनतेच्या मदतीसाठी तत्पर राहून एक विश्वासार्ह नेता म्हणून आपली छाप निर्माण केली आहे.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहभागी सर्व कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व ट्रस्टचे आभार मानण्यात आले. भविष्यातही असे उपक्रम अधिक व्यापक स्तरावर राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

सदर कार्यक्रमासाठी जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, नरेंद्र पढाल, किर्तनकार केशवानंद मेश्राम तथा मान्यवर आदी लोक उपस्थित होते.

Comments