खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

*इरई नदी खोलीकरणासाठी उद्योगांचाही पुढाकार*

*इरई नदी खोलीकरणासाठी उद्योगांचाही पुढाकार*

चंद्रपूर, दि. 14 मे : चंद्रपूर शहरात होत असलेल्या इरई नदीच्या खोलीकरण अभियानात आता जिल्ह्यातील उद्योगांनीही पुढाकार घेतला आहे. विविध उद्योगांनी आपल्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड) नदीच्या खोलीकरणासाठी साहित्य उपलब्ध करून दिले असून यात पोकलेन, टिप्पर आणि हायवा यांचा समावेश आहे.

चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते 25 एप्रिल रोजी करण्यात आला. पहिल्या टप्प्यात रामसेतू ते चौराळा पूल या दरम्यान खोलीकरण करण्यात येत आहे. सद्यस्थितीत चार ठिकाणी काम सुरू आहे. यासाठी लॉयड्स मेटल्स कंपनीने सीएसआर निधीतून 3 पोकलेन मशीन तसेच 6 टिप्पर / हायवा उपलब्ध करून दिले आहेत. तर अल्ट्राटेक सिमेंट उद्योगाने 1 पोकलेन मशीन आणि 2 हायवा खोलीकरणासाठी दिले आहेत.

याशिवाय चार वेगवेगळ्या ठिकाणावर एकूण 8 पोकलेन मशीन कार्यरत असून यात जलसंपदा विभागाचे 3, सीएसआर निधीतून 1 आणि चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या 4 पोकलेनचा समावेश आहे. तसेच खोलीकरणासाठी एकूण 13 टिप्पर / हायवा, जेसीबी आणि 21 ट्रक्टर कार्यरत आहेत. आतापर्यंत नदी पात्रातून 21 टीसीएम गाळ (अंदाजे 7500 ब्रास) काढण्यात आला असून 26 शेतक-यांना 1158 ब्रास गाळ मोफत वाटप करण्यात आला आहे. गाळ नेण्यासाठी  आतापर्यंत 42 शेतक-यांनी अर्ज केले आहेत.

शासन, प्रशासन आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून इरई नदी खोलीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील इतरही उद्योगांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

००००००

Comments