गांधी चौकात पानठेल्यासमोर सुरू होता सट्टापट्टीचा अड्डा; पोलिसांच्या छाप्यात एक जुगारी ताब्यात, रोख रक्कम जप्त

गांधी चौकात पानठेल्यासमोर सुरू होता सट्टापट्टीचा अड्डा; पोलिसांच्या छाप्यात एक जुगारी ताब्यात, रोख रक्कम जप्त वरोरा, दि. २० एप्रिल २०२६: शहरातील गांधी चौक परिसरात पानठेल्याच्या आडून सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा मारून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका संशयित जुगारीला ताब्यात घेत त्याच्याकडून सट्टापट्टीचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २० एप्रिल रोजी पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे (बं.नं. २५७१) व त्यांच्या पथकातील अंमलदार मनोज ठाकरे व विशाल राजुरकर हे खाजगी वाहनाने शहरात अवैध जुगार प्रतिबंधासाठी गस्त घालत होते. यादरम्यान पोलिसांना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, मौजा गांधी चौक येथील पानठेल्यासमोर शेख अरबाज नावाचा एक इसम लोकांकडून पैसे घेऊन टाईम बाजार सट्टापट्टी आकड्याचा जुगार खेळवत आहे. माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी दोन स्वतंत्र साक्षीदारांना पंच म्हणून बोलावले. पंचांसह पोलीस पथकाने सदर ठिकाणी धाड टाकली असता, तेथे ...

सौ वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य स्तरीय फ्लॉंरेंन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित ‌

सौ वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य स्तरीय फ्लॉंरेंन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित ‌

वरोरा 
फक्त बातमी 
    नर्सिंग क्षेत्रातिल प्रतिष्ठीत समजला जाणारा महाराष्ट्र शासनाचा राज्य स्तरीय फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल आंतरराष्ट्रीय परिचारिका पुरस्कार वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांना मा.प्रकाशजी आबीटकर सार्वजनिक आरोग्य मंत्री व खासदार धर्यशील माने यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले 
 दिनांक १२ मे २०२५ ला राजश्री शाहू महाराज सभागृह कोल्हापूर येथे महाराष्ट्र शासनाचा राज्य स्तरीय फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल नर्सेस पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित खासदार धर्यशल माने, प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री, डॉ नितीन आंबाडेकर संचालक आरोग्य सेवा मंडळ मुंबई, डॉ पुरुषोत्तम मडावी उपसंचालक शुश्रुषा आरोग्य सेवा मंडळ मुंबई, डॉ निलिमा सोनवणे सह.संचालक शुश्रुषा आरोग्य सेवा मुंबई, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाचा राज्य स्तरीय सहा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.त्यामध्ये वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांना धर्यशिल माने खासदार व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व ईतर मान्यवरांच्या उपस्थितीत वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका यांना प्रदान करण्यात आला.

Comments