खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

*शाश्वत आदिवासी विकासासाठी डिजिटल उपक्रम दिशादर्शक ठरणार - मंत्री डॉ. अशोक उईके*

*शाश्वत आदिवासी विकासासाठी डिजिटल उपक्रम दिशादर्शक ठरणार - मंत्री डॉ. अशोक उईके*

*Ø प्रकल्प अधिका-यांची राज्यस्तरीय कार्यशाळा*

*Ø नाविन्यपूर्ण पोर्टलचे उ‌द्घाटन*

चंद्रपूर, दि. 9 एप्रिल : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विभागाने विविध नाविन्यपूर्ण पोर्टल सुरू केले आहे. या डिजिटल पुढाकारामुळे भविष्यातील सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आदिवासी विकास विभागाने टाकले असून हा उपक्रम नक्कीच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित प्रकल्प अधिका-यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री डॉ. उईके यांच्या हस्ते विविध नाविन्यपूर्ण पोर्टलचे ऑनलाईन उ‌द्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त लीना बनसोड, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त समीर कुर्तकोटी, अप्पर आयुक्त गोपीचंद कदम उपस्थित होते.

मंत्री डॉ. उईके म्हणाले, आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी व्यापक कृती आराखडा तयार करावा. हा आराखडा म्हणजे फक्त योजना नव्हे, तर आदिवासी समाजाच्या शाश्वत विकासासाठीचा एक दृढ संकल्प असला पाहिजे. राज्यातील प्रत्येक आदिवासी कुटुंबाच्या उन्नतीसाठी विभाग कटिबद्ध आहे. विभागामार्फत विविध योजनांसाठी इतर विभागांना दिल्या जाणाऱ्या निधीच्या वापराबाबत अनियमितता  यासंबंधी विभागाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

*विद्यार्थी हा विकासाचा केंद्रबिंदू :* राज्यातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवण व्यवस्थापनामध्ये पारदर्शकता आणि गुणवत्तेचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी सेंट्रलाइज्ड डॅशबोर्ड प्रणाली कार्यान्वित करावी. समाजातील शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवणे, ही आदिवासी विकास विभागाची प्राथमिक जबाबदारी आहे. विद्यार्थी हा विकासाचा केंद्रबिंदू असून, त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. त्यामुळे विभागामार्फत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रभावी नियोजन आणि प्रयोजनशील उपाययोजना कराव्यात.

*प्रकल्प अधिका-यांनी वसतीगृहांना भेट द्यावी :* आदिवासी समाजाच्या विकासासाठी संवाद होणे आवश्यक आहे. त्यासाठी पालक मेळाव्यांचे आयोजन करावे. सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांनी आदर्श आश्रम शाळेसाठी नियोजन करावे. वसतिगृहामध्ये सल्लागार समिती गठीत करून प्रकल्प अधिकाऱ्यांनी दर महिन्याला वसतिगृहांना भेट द्यावी. तसेच तेथील सोयी सुविधांची पाहणी करावी. असेही मंत्री डॉ. उईके यांनी यावेळी सांगितले.

*विविध पोर्टलचे उद्घाटन :* मान्यवरांच्या हस्ते आदिवासी आयुक्तालयाचा वार्षिक आराखडा आणि आर्थिक नियोजन संकलन पुस्तिकेचे प्रकाशन  करण्यात आले. तसेच तक्रार निवारण पोर्टल, शबरी नॅचरल्स ई-कॉमर्स पोर्टल, न्यूक्लियस बजेट पोर्टल, सन्मान पोर्टल, कॉल आऊट सुविधा, इ निरीक्षक ॲप, टास्क मॅनेजर सॉफ्टवेअर, AEBAS उपस्थिती प्रणाली या नाविन्यपूर्ण पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सचिव विजय वाघमारे आणि आयुक्त लीना बनसोड यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेस विभागातील वरिष्ठ अधिकारी, प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

पोर्टल विषयी थोडक्यात माहिती

*शबरी नॅचरल्स इ कॉमर्स पोर्टल :* आदिवासी बांधवांची प्रिमियम उत्पादने ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होणार आहे.
 
*न्यूकलियस बजेट :* आदिवासी बांधवांना प्रकल्प अधिकारी स्तरावरून अनुदान देण्यासाठी.

*पोर्टल कॉल आऊट सुविधा :* लाभार्थ्यांना लाभ मिळाला की नाही, त्यांना काय अडचणी आल्या याबाबत आता कॉल आउट सुविधा सुरू करण्यात आली आहे.

*सन्मान पोर्टल :* सहकार्य, न्याय, मार्गदर्शन आणि निवारण असे हे पोर्टल आदिवासी विभागातील कर्मचाऱ्यांच्या तक्रार निवारण प्रणाली आहे.

*एईबीएएस पोर्टल :* आधारच्या माध्यमातून सर्व कर्मचारी अधिकारी यांची दैनंदिन हजेरी फेस आयडी नुसार घेतली जाणार आहे.

*ई- निरीक्षक ऍप्लिकेशन :* शाळांची मॉनिटरिंग करून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी वापरण्यात येणारी प्रणाली

*टास्क मॅनेजर :* अधिकारी कर्मचारी यांची नियमित दैनंदिन कामे ऑनलाईन पोर्टल वर नियंत्रित करणे.

०००००००

Comments