वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

*ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी*

*ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी*

चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19)  वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मायनिंग ऑपरेशन कसे होते, गुणवत्ता कशी राखली जाते, कोळसा खाण प्रबंधन कसे केले जाते, याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच पाईप कन्व्हेनरचे निरीक्षण सुद्धा जाणून घेतले. पाईप कन्व्हेनरच्या माध्यमातून रोज 6 हजार टन कोळसा पाईपद्वारे वाहतूक होते. त्यामुळे प्रदूषण थांबण्यास मदत होते,  याबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली. 

यावेळी बोलताना राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या,  कोळसा खाण प्रकल्पात महिला कर्मचारी व अधिकारी सुद्धा कार्यरत आहे, हे जाणून आनंद झाला. सर्वांनी अतिशय चांगले काम करावे. महिला आज पुरुषांसोबत कोळसा खाण प्रकल्पामध्ये काम करीत आहे. चांगल्या कामामुळे आणखी वीज निर्मिती होईल. असेच काम भविष्यात सुद्धा सुरू राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी इरई धरणाची सुद्धा पाहणी केली.

यावेळी ऑपरेशनल डायरेक्टर संजय मारुडकर, मुख्य अभियंता विजय राठोड, कार्यकारी संचालक पंकज सपाटे, यांच्यासह एरिया जनरल मॅनेजर हर्षद दातार, क्षेत्र प्रबंधक पुनम जेढढोबळे, खाण प्रबंधक मोहम्मद, डी.एन. तिवारी, सुनील ताजने, हरीश गव्हाळे आदी उपस्थित होते

*महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार* :  ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या हस्ते कोळसा खाण प्रकल्पात कार्यरत असलेल्या  महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात विना गिरडकर, सारिका पोडे, प्रतिभा नांदे व इतर महिलांचा समावेश होता.

Comments