वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

विज्ञान समृद्धी पुस्तकाचे प्रकाशन

विज्ञान समृद्धी पुस्तकाचे प्रकाशन 
वरोरा 
फक्त बातमी 

वरोरा इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मुला मुलींना स्थानिक उपलब्ध असलेल्या साहित्यातून विज्ञानाचे प्रयोग करता यावे याकरिता विज्ञान समृद्धी पुस्तक तयार करण्यात आले या पुस्तकाचे प्रकाशन एका कार्यक्रमात करण्यात आले .
विज्ञान समृद्धी पुस्तकाच्या लेखिका तथा प्रभारी मुख्याध्यापिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कचराळ्याच्या उज्वला प्रवीण खिरटकर  या आहेत विज्ञान समृद्धी पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष विलास टिपले होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर भद्रावती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश महाकाळकर ओंकार कॉन्व्हेंट च्या मुख्याध्यापिका विद्या काळे वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे महारोगी सेवा समिती आनंदवनची विश्वस्त सुधाकर कडूसोनंम मडावी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत खुळे स्थळ चित्रपटाची निर्माते जयंत सोमलकर वामन ठावरी प्रवीण खिरटकर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन रेखा झाडे तर पुस्तकाची विवेचन प्राध्यापक डॉक्टर प्रशांत खुळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कल्पना कथडे यांनी मानले.

Comments