लग्नसराईत घरफोडीचा धोका वाढला; वरोरा पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आव्हान.

लग्नसराईत घरफोडीचा धोका वाढला; वरोरा पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन बातमी: वरोरा : लग्नसराईच्या हंगामात अनेक नागरिक आपल्या घरांना कुलूप लावून बाहेरगावी कार्यक्रमासाठी जात असल्याने घरफोडीच्या घटनांचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन वरोरा यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांच्या निवेदनानुसार, घर बंद करून बाहेर जाताना काही महत्त्वाच्या गोष्टींची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. घराचे कुलूप बाहेरून टॉर्च मारल्यावर दिसणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच लोखंडी गेटला बाहेरून कुलूप न लावता आतूनच लॉक करावे, जेणेकरून घर बंद असल्याचे सहज लक्षात येणार नाही. याशिवाय, घरात मौल्यवान वस्तू किंवा मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवणे टाळावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती रात्री किंवा दिवसा फिरताना दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे किंवा आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वरोरा पोलिसांनी नागरिकांना सावध राहून स्वतःच्या आणि परिसराच्या सुरक्षेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ...........

श्री सदगुरु संत पादका पुजन, दर्शन व भजन सोहळ्याचे आयोजन

संग्रहित फोटो 

श्री सदगुरु संत पादका पुजन, दर्शन व भजन सोहळ्याचे आयोजन

भद्रावती : अक्षय तृतीयेच्या पावन पर्वावर गुरुवार दि. १ मे रोजी दुपारी २ वाजेपासुन तर सायंकाळी ८ वाजेपर्यंत स्थानिक बाजार वॉर्डातील रवींद्र शिंदे यांच्या निवासस्थानी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व भजन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. याप्रसंगी स्थानिक रवींद्र शिंदे यांच्या निवासस्थानी दि. १ मे रोज गुरुवारला दुपारी १ वा. शेगावचे गजानन महाराज, भांदेवा-डाचे जगन्नाथ महाराज, अमरावती जिल्ह्यातील घुईखेड येथील सजीवन समाधिस्त श्री संत बेंडोजी महाराज, यांचे पादुका पुजन आणि दर्शनाचा लाभ उपस्थितांना घेता येईल. या दर्शन व पूजन सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले ट्रस्टचे संस्थापक सदस्य रवींद्र शिंदे यांनी केले आहे. या सोह-ळ्यादरम्यान सायंकाळी ४ वाजेपासून महाप्रसाद वितरण करण्यात येईल.



Comments