वरोरा येथे शेतातील चन्याच्या गंजीला आग, शेतकऱ्याचे १.७५ लाखांचे नुकसान

वरोरा येथे शेतातील चन्याच्या गंजीला आग, शेतकऱ्याचे १.७५ लाखांचे नुकसान वरोरा, दि. ४ मार्च – तालुक्यातील लोनगाडगा शिवारात एका शेतकऱ्याच्या चन्याच्या गंजीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना आज पहाटे घडली. या आगीत सुमारे ३५ क्विंटल चना जळून खाक झाल्याने शेतकऱ्याला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. याबाबत तक्रारदार मिलिंद मनोहरराव भोयर (वय ४७, रा. वंधली, ता. वरोरा) यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे लोनगाडगा बसस्टॉपजवळ सर्वे क्र. १०३ मध्ये १९ एकर शेत आहे. त्यापैकी ५ एकरात त्यांनी चना पिकवला होता. ३ एकरातील चना कापून त्याची गंजी (रास) शेतात टाकलेली होती. ही गंजी त्यांनी १ मार्च रोजी तयार केली होती. धुळवडीनंतर थ्रेशरने चना काढण्याचे नियोजित होते. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास, ते घरी झोपलेले असताना त्यांच्या गड्याचा मुलगा रविंद्र श्रिरामे याने दारात येऊन शेतातील चन्याची गंजी जळत असल्याचे सांगितले. यानंतर तत्काळ ते रविंद्र, भानुदास श्रिरामे आणि सुर्यभान किनाके यांच्यासह शेतात गेले. परंतु तोपर्यंत चन्याची संपूर्ण गंजी जळून खाक झ...

वरोरा पोलीसांची मोठी कारवाई आरोपीकडून ९,६७,६०० रूपयांचा प्रतिबंधीत तंबाखु पकडला.

वरोरा पोलीसांची मोठी कारवाई आरोपीकडून ९,६७,६०० रूपयांचा प्रतिबंधीत तंबाखु पकडला.

वरोरा 
चेतन लूतडे 

 दि.२५/०४/२०२५ रोजी वरोरा पोलीस स्टेशन येथील पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन वरोरा येथील पोउपनि दिपक ठाकरे सोबत, पो.अं. संदीप मुळे/२५७१, पो.अं. विशाल राजुरकर/ ०१ असे पो.स्टे. ह‌द्दीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या तंबाखुवर रेड कामी पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीरद्वारे मिळालेल्या खबरेनुसार  नागपुर येथून चंद्रपूर कडे वाहन कमांक एम. एच. ३४ बी.एफ. ८९८२ या लाल रंगाच्या कार मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखुचा साठा भरून चंद्रपूर कडे अवैध्यरित्या विकी साठी वाहतुक करीत आहे अशा मुखबीरच्या खात्रीशीर खबरेवरून पंच व पोस्टॉप सह नंदोरी टोलनाका येथे जावून तात्पुरती नाकाबंदी केली असता, मुखबीरच्या खबरेप्रमाणे लाल रंगाची कार क्रमांक एम.एच. ३४ बी.एफ.८९८२ येतांना नंदोरी टोल नाका येथे दिसली. सदर कारला पोस्टॉप चे मदतीने पंचासमक्ष थांबवून सदर कारला बाजुला घेवून सदर कारची पाहणी केली असता, सदर कार की लाल रंगाची DATSUN या कंपनीची असून त्यात एक पुरुष ईसम व एक महीला ईसम दिसून आली. त्यांना पोलीस व पंचाचा परिचय देवून त्यांचे नाव व पत्ता विचारता कार चालकाने आपले नाव १) मुकेश नगीनभाई कातरानी वय ४६ वर्ष रा. नेरी वार्ड दुर्गापूर ता. जि. चंद्रपूर व ड्रायव्हर सिट च्या बाजुला बसलेल्या महीलेने आपले नाव २) राणी मुकेश कातरानी वय ४० वर्ष रा. नेरी वार्ड दुर्गापूर ता.जि. चंद्रपूर असे सांगीतले त्यांना त्यांचे ताब्यातील कारची महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या सुगंधीत तंबाखुची झडती घेण्याचा उद्देश सांगून झडती घेतली असता, नमुद कारमध्ये एकुण २, २,६७,६०० रूपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखु मिळून आला आणि सुगंधीत प्रतिबंधीत तंबाखु ची वाहतुक करणे करिता वापरलेली लाल रंगाची DATSUN कंपनीची कार क. एम.एच.३४ बी.एफ.८९८२ कि.अं.७,००,००० रूपये असा एकुण ९,६७,६००/-रू.चा मुद्देमाल मिळून आला. आरोपी क्र.१ व २ यांना अधिक विचारपुस केली असता, त्यांनी सदर प्रतिबंधीत तंबाखू हा पाहीजे आरोपी नामे रक्षा ठक्कर, आशिष ठक्कर दोन्ही रा. दुर्गापूर ता.जि. चंद्रपूर यांचे सांगणेवरून नमुद कार मध्ये दुर्गापूर ता. जि. चंद्रपूर येथे hoga आणणेकरिता सांगीतल्याने घेवून येत असल्याचे सांगीतल्याने आरोपी नामे १) मुकेश नगीनभाई कातरानी वय ४६ वर्ष रा. नेरी वार्ड दुर्गापूर ता. जि. चंद्रपूर व ड्रायव्हर सिट च्या बाजुला बसलेल्या महीलेने आपले नाव २) राणी मुकेश कातरानी वय ४० वर्ष रा. नेरी वार्ड दुर्गापूर ता. जि. चंद्रपूर आणि पाहीजे आरोपी नामे ३) रक्षा ठक्कर ४) आशिष ठक्कर दोन्ही रा. दुर्गापूर ता. जि. चंद्रपूर वरील आरोपीचे कृत्य कलम १२३,२२३,२७४,२७५, ३ (५) भारतीय न्याय संहीता सहकलम ३० (२), २६ (२) (अ),३,४, ५९ (आय) अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ अन्वये गुन्हा होत असल्याने सदर आरोपींतां विरूद्ध वरील कलमान्वये पोलीस स्टेशन वरोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. श्री पोलीस अधिक्षक सा. चंद्रपूर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक मॅडम चंद्रपूर, मा. नयोमी साटम मॅडम सहायक पोलीस अधिक्षक तथा पोलीस उपविभागीय अधिकारी, वरोरा यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस ठाणे वरोराचे ठाणेदार अजिंक्य तांबडे, पोउपनि. दिपक ठाकरे, पो.अं. संदीप मुळे, पो. अं. विशाल राजुरकर, पोहवा दिलीप सुर यांनी केली.


Comments