*फिल्डवरील विकास कामांची जिल्हाधिका-यांकडून पाहणी**Ø प्रशासकीय इमारत, पाणंद रस्ता, विहीर बांधकाम, पीएचसीला भेट*
*Ø प्रशासकीय इमारत, पाणंद रस्ता, विहीर बांधकाम, पीएचसीला भेट*
चंद्रपूर, दि. 16 एप्रिल : राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत क्षेत्रीय भेटीदरम्यान जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी मंगळवारी गोंडपिपरी तालुक्यातील विविध विकास कामांना भेटी देऊन आढावा घेतला.
सदर भेटीदरम्यान जिल्हाधिका-यांनी मौजा करंजी येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उज्वल महिला प्रभागसंघ यांची भेट घेतली व मार्गदर्शन केले. तसेच येथील दाल मिल व राईस मिल भेट देऊन कामकाज विषयक आढावा घेतला. गोंडपिपरी तालुका मुख्यालयी नव्याने बांधकाम होत असलेल्या मुख्य़ प्रशासकीय इमारतीची त्यांनी पाहणी केली. यानंतर मौजा वढोली येथे पांदण रस्ता पाहणी, मनरेगा विहीर कामांची पाहणी, कोसा ( रेशीम ) उद्योगास भेट, तसेच स्थानिक शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. नागरिकांच्या या अडचणीबाबत त्यांनी संबंधित यंत्रणेला सुचना दिल्या.
त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी मौजा सकमुर येथील बचत गटाच्या मत्स्य़ बीज व्य़वसाय भेट देऊन मार्गदर्शन केले. मौजा पोडसा येथे वर्धा नदीवरील (महाराष्ट्र – तेलंगाणा) पुलाची पाहणी केली. तसेच मौजा तोहोगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन तेथील वैद्यकीय अधिका-यांसोबत रुग्णालयालीत यंत्रसामुग्री, औषधांची उपलब्धता व इतर सुविधा इत्यादीसंबधी आढावा घेतला. मौजा पाचगांव येथील बांबु व्यवस्थापन केंद्रास भेट देऊन तेथील कामकाज विषयक आढावा घेतला.
जिल्हाधिका-यांसोबत यावेळी गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तहसीलदार शुभम बहाकर, गटविकास अधिकारी श्री. चांगफणे, मुख्याधिकारी विवेक चौधरी, नायब तहसीलदार चंद्रशेखर वेटे, मंडळ अधिकारी प्रशांतसिंग बैस यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
००००००
Comments
Post a Comment