तालुका प्रतिनिधी (भद्रावती):-
वेकोली माजरी क्षेत्राच्या कुचना येथील क्षेत्रीय कार्यालयात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत क्षेत्रीय महाप्रबंधकांसोबत राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला खा. प्रतिभा धानोरकर,मजदूर संघाचे माजरी क्षेत्राचे अध्यक्ष धनंजय गुंडावार, सचिव परमानंद चौबे, संघाचे सर्व उपक्षेत्रिय अध्यक्ष तथा सचिव उपस्थित होते. या बैठकीत कामगारांच्या समस्यांविषयी चर्चा करण्यात आली.सी एम पी एफ कार्यालयाद्वारे रिवाईज पेन्शन मध्ये होत असलेली दिरंगाई, 2017 पासून होत नसलेले पासबुक पोस्टिंग, विधवांच्या पेन्शनला होत असलेला उशीर, माजरी वसाहतीमध्ये पाच तासांची होत असलेली वीज कपात, कामगारांच्या आवास दुरुस्तीत होत असलेला उशीरष माजरी ओपन कास्ट बंद झाल्यानंतर कामगारांना क्षेत्रातच पदस्थ करणे, कामगारांना आवास ऊपलब्ध करुन देण्यात होत असलेला भेदभाव यासह कामगारांच्या सर्व समस्यांवर चर्चा करण्यात आली. या सर्व समस्या लवकरच निकालात काढण्यात येईल असे आश्वासन यावेळी महाप्रबंधाकडून देण्यात आले. बैठकीला चंद्रकांत बोढाले, गोलाकुमरय्या, पवन राय, कबीर भाईष असलम अंसारी, रवी आवारी, आनंद आंबीलकर, साईनाथ वाकुलकर, गोकुळानंद गोस्वामी, विनोद गंपावार, राजाराम ऊइके, जितेंद्र चिंचाळकर, प्रमोद वासेकर आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment