वरोरा शहरात साजरा होणार श्री शनिपालट उत्सव
मिती फाल्गुन कृष्ण पक्ष शुभ संवत २०८९ शके १९४६ तिथी अमावशा वद्य ३० शनिवारला
कुंभ, मीन आणि मेष राशीला साडेसाती राहिल.
वरोरा
चेतन लूतडे
सर्व भाविक भक्तांना आनंद होत आहे की दर अडीच वर्षाप्रमाणे यंदाही शनि पालट उत्सव दिनांक २९/०३/२०२५ शनिवारला वरोरा येथील मंदिरात साजरा होत आहे. शनि रात्री ९.४२ मि. मीन राशीत प्रवेश करित आहे. त्याचा पुण्यकाल शनिवारी सायंकाळी ६.४८ पासुन रात्री १२.३६ मि. पर्यंत आहे. हा मिन राशीला मध्ये पहिला ,कुंभ राशीला दुसरा, मकर राशीला तिसरा, धनुराशीला चौथा, वृश्चिक राशीला पाचवा, तुला राशीला सहावा, कन्या राशीला सातवा, सिंह राशीला आठवा, कर्क राशीला नववा, मिथुन राशीला दहावा, मेष राशीला बारवा या प्रमाणे आहे. आणि मकर राशीची साडेसाती संपत आहे. व कुंभ, मीन आणि मेष राशीला साडेसाती राहिल. तरी सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा.
ज्यांना सातेसाठी आहे त्यांनी त्या दिवशी येवुन शनि जाप, शनि होम आणि शनि अभिषेक करावे. हे केल्याने कष्ट दुर होईल, चिंता दूर होईल. धंदा नोकरीमध्ये यश मिळेल नवग्रह शनिमंदिर मध्ये भक्तांची जन्मतारीख, जन्म वेळ पाहून कुंडली काढण्यात येते.
जन्म माशी. पाया (चरण). फळ
वृषभ तुला मिन सुवर्ण. चिंता
कर्क-वृश्चिक कुंभ. रौप्य (चांदी). शुभ
मिथुन-कन्या-मकर. तांबा. श्री प्रभी
मेष-सिंह-धनु. लोहा. कष्ट
------------------------------------------------------
कालसर्प दोष , पितृ दोष , नागबली पूजन. भक्तांना उज्जैन (मध्यप्रदेश) महाकालेश्वर येथे जावून पूजा करावी लागेल.
गुलफल गुरुग्रह ८ वा तुला राशीमध्ये १२ वा मिथुन राशीमध्ये व ४ था कुंभ मध्ये अनिष्टकारक आहे. ज्या राशीला गुरू अनिष्ट कारक आहे. त्या राशी वाल्यांनी शनि मंदीरामध्ये येवुन महाराजाला भेटावे आणि जप, होम करावे या राशींना १४ में पर्यंत गुरू अनिष्ट कारक आहे. मुला-मुलींचे लग्न नाही जमत नसेल तर त्यांनी गुरूचे • जाप करून शनिमंदीरामध्ये जाऊन गुरुच्या मुर्तीवर अभिषेक करावे. ८ वा. १२ वा. ४ था गुरु दिनाक १४ में ला निघेल. आणि १४ में ला गुरू वृश्चिक राशी कर्क व मीन राशीमधे गुरू प्रवेश करणार.
*टिप- दि. २९/३/२०२५ ला पहाटे शनिदेवच्या गाभाऱ्याच्या अंद्र मर्तीवर अभिषेक होईल.
ज्यांना पहाटे ५ वा. अभिषेक करायचे आहे, त्यांनी शनिमंदीरात येऊन वरोरा येथील गोपाल महाराज यांच्याशी संर्पक करावा. तसेच २९ तारखेला सकाळी ११ वाजेपासुन सायं. ६ वाजेपर्यंत महायज्ञ होईल. नवग्रह पुजा होईल, अभिषेक होईल.
पुर्ण आहूती सायं. ६.०० वा.
महा आरती सायं. ७.०० वा.
* सुचना :- दर शनिवारी शनिदेवाचे मुर्तीवर अभिषेक होईल. ज्यांना अभिषेक करावयाचे आहे. त्यांनी पं. गोपाल महाराज पुजारी यांना भेटावे. शनिवार, दि. ५/४/२०२५ ला सायं. ७ वा. महाप्रसाद होईल.
ज्यांना मुला-मुलींना मंगल दोष (मांगलिक) आहे त्यांनी नवग्रह शनि मंदिर मध्ये मंगळाचा जप, होम, अभिषेक करावा. तसेच पिंपळाच्या झाडासोबत विधीयुक्त पध्दतीने लग्न लावण्यात येईल. मुला-मुलींची कुंडली पाहण्यात्त जन्म वेळ, जन्म तारीख घेऊन यावी. त्यावरून मंगलदोषाचा उपाय सांगण्यात येईल.
शुक्रवार, दि. २७/०३/२०२५ पासुन भजन व सुंदरकांड रात्रीला ९.०० राहील.
__________________________
शनिदेवाच्या वाईट प्रभावाला कमी करण्यासाठी उपाय:
- शनिदेवाच्या मंत्राचा जप:शनिदेवाचे बीज मंत्र "ॐ शं शनैश्चराय नमः" चा जप करा.
- शनि मंदिरात जा:
- शनिदेवाच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करा आणि प्रार्थना करा.गरजू लोकांना दान करा:
- शनिवारी गरजू लोकांना अन्न, कपडे, किंवा इतर आवश्यक वस्तू दान करा.
- काळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करा:
- शनिवारी काळ्या रंगाचे कपडे, तेल, किंवा इतर वस्तू दान करा.
- शनिदेवाच्या नावाचा जप करा:
- शनिदेवाचे नाव वारंवार घ्या, जेणेकरून त्यांची कृपा आपल्यावर राहील.
- हनुमानाची पूजा करा:
- शनिदेवाचे भक्त हनुमान आहेत, म्हणून हनुमानजींची पूजा करणे देखील फायद्याचे ठरू शकते.
- पिंपळाच्या झाडाची पूजा करा:
- शनिदेवाला पिंपळचे झाड खूप आवडते, त्यामुळे पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि त्याची पूजा करा.
- शनिवारी उपवास ठेवा:
- काही लोक शनिवारी उपवास ठेवतात, जेणेकरून शनिदेवाचा प्रकोप कमी होईल.
- शनिवारी तेल अर्पण करा:
- शनिदेवाला तेल अर्पण करणे देखील शुभ मानले जाते.
- शनिवारी कावळ्याला अन्न द्या:
- कावळा हे शनिदेवाचे वाहन मानले जाते, त्यामुळे शनिवारी कावळ्याला अन्न द्या. शनिवारी काळ्या कुत्र्याला चपाती द्या:
- शनिवारी काळ्या कुत्र्याला चपाती खायला देणे देखील शुभ मानले जाते. मादक पदार्थांपासून दूर राहा:
- मादक पदार्थांचा सेवन करणे टाळा, कारण शनिदेव हे शिस्त आणि जबाबदारीचे प्रतीक मानले जातात.
- शनिवारी तेल लावलेला दिवा लावा:
- शनिदेवाला तेल लावलेला दिवा लावल्याने ते प्रसन्न होतो.
खाटूश्यामजींची भजन संध्या
दि. ८/४/२०२५ ला, सायं. ६.०० वाजता
स्थळ- शनि मंदीर रोडवर, यात्रा वार्ड, वरोरा
गायिका जया पवन आचार्य (राज.)
Comments
Post a Comment